Shardiya Navratri 2023 : नवरात्रीआधी या वस्तू करा घराबाहेर, देवी होईल प्रसन्न

Shardiya Navratri 2023 देवीला स्वछता प्रिय आहे. घरात अस्वछता असेल आणि नकारात्मक उर्जा निर्माण करणारे घटक असतील तर देवी कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे नवरात्रीच्या आधी घरात असलेल्या काही गोष्टी अवश्य घराबाहेर करा. जाणून घेऊया या कोणत्या गोष्टी आहेत. 

Shardiya Navratri 2023 : नवरात्रीआधी या वस्तू करा घराबाहेर, देवी होईल प्रसन्न
नवरात्री २०२३Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 1:14 PM

मुंबई : नवरात्री वर्षातून 4 वेळा साजरी केली जाते. माघ, चैत्र, आषाढ आणि अश्विन महिन्यांत. अश्विन नवरात्रीला शारदीय नवरात्री (Shardiya Navratri 2023) म्हणून ओळखले जाते. शारदीय नवरात्रीचे 9 दिवस शक्तीस्वरूपा  दुर्गा देवीची पूजा केली जाते. असे मानले जाते की मा दुर्गामध्ये विश्वाच्या सर्व शक्ती आहेत. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने सर्व समस्या नष्ट होतात. 9 ग्रहांचे अशुभ दूर होतात. जीवन आनंदी होते. घटस्थापना शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर केली जाते. यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात 15 ऑक्टोबरपासून होणार असून, 24 ऑक्टोबरला दसऱ्याला समाप्ती होईल. शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. या शुभ मुहूर्ताची साधक आतुरतेने वाट पाहतात.

देवीला स्वछता प्रिय आहे. घरात अस्वछता असेल आणि नकारात्मक उर्जा निर्माण करणारे घटक असतील तर देवी कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे नवरात्रीच्या आधी घरात असलेल्या काही गोष्टी अवश्य घराबाहेर करा. जाणून घेऊया या कोणत्या गोष्टी आहेत.

नवरात्रीआधी या गोष्टी करा घराबाहेर

कांदा लसूण : कांदा आणि लसून तामसिक वस्तू मानल्या जाते ज्योतिष शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये भक्तांनी लसूण आणि कांदा यांचे सेवन करू नये. तुटलेल्या मुर्ती : मान्यतेनुसार, जर तुमच्या घरात देवी-देवतांच्या तुटलेल्या मूर्ती असतील तर शारदीय नवरात्रीच्या आधी त्या घरातून काढून टाका, कारण या मूर्ती तुमच्या घरात वास्तु दोष निर्माण करतात. तसेच, मूर्ती इतरत्र न टाकता पवित्र नदीत विसर्जित केल्या पाहिजेत. फाटलेले कपडे : असे म्हणतात की, देवीचे स्वागत करण्यापूर्वी घरात अस्वच्छता असेल तर देवी नाराज होते. अशा वेळी घरातील जुने फाटलेले कपडे फेकून द्यावेत. दारावरचे वाळलेले तोरण : बऱ्याचदा आपण कार्य प्रसंगानिमीत्त घराच्या दाराला फुलांचे तोरण लावतो. त्या नंतर ते काढायचे आपण विसरतो. मात्र नवरात्रीच्या आधी असे वाळलेले तोरण अवश्य काढावे.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?.
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.