वास्तुशास्त्रानुसार घरात ही झाडे लावणे अशुभ; येतो नात्यात दुरावा अन् घरात नकारात्मकता
वास्तू शास्त्रानुसार घरात काही रोपे लावणे टाळले पाहिजे अन्यथा त्यामुळे घरात नकारात्मकता येते. एवढंच नाही तर नात्यात वाद, या वातावरनामुळे कटकटी होऊ लागतात असंही म्हटलं जातं.

अनेकांच्या घरात इनडोअर प्लांट असतात. तसेच बाल्कनीतल देखील अनेक विविध प्रकारची रोपे लावलेली आपण पाहिली असतील. त्यामुळे घरात आणि बाहेर देखील सर्वत्र हिरवळ असते आणि वातावरणात शांतताही वाटते. पण घरात आणि बाल्कनीत अशी अनेक रोपे असतात जी लावणे चांगले नसते. त्याचे परिणाम आपल्या वास्तूवर आणि आपल्या आयुष्यातही घडतात. वास्तुशास्त्रानुसार, काही झाडे घरासाठी अशुभ मानली जातात. असे म्हटले जाते की ते घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. त्या झाडांबद्दल जाणून घेऊयात.
चिंचेचे झाड नसावे
यातील पहिलं म्हणजे घरात किंवा बाल्कनीत चिंचेचे झाड नसावे. वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की ते नकारात्मक ऊर्जा आणते. यामुळे घराचे वातावरण खूप बिघडू शकते. घरात वाद होण्याची शक्यता असते.
बाभळीचे झाड देखील लावले जात नाही
घरात बाभळीचे झाड देखील लावले जात नाही. वास्तुशास्त्रानुसार, ते घरात लावल्याने वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा येते. म्हणून, ते चुकूनही घरात आणू नका.जर तुमच्या घरात वेल असेल आणि ती भिंतीवर चढत असेल तर वास्तुशास्त्रानुसार ते योग्य नाही. अशा रोपाला भिंतीवर वाढवणे योग्य नाही.
मृत किंवा वाळलेली रोपे ठेवू नयेत.
घरात मृत किंवा वाळलेली रोपे ठेवू नयेत. जर ती घरात राहिली तर ती नकारात्मक उर्जेला आमंत्रण देतात. म्हणून, जर एखादे रोप सुकले असेल तर ते ताबडतोब काढून टाकावे.
रबराचे रोप देखील लावू नये
घरात रबराचे रोप देखील लावू नये. असे म्हटले जाते की त्याची काळी आणि मोठी पाने घरातील सर्व चांगली ऊर्जा शोषून घेतात आणि घरातील नात्यात दरी निर्माण करतात. त्यामुळे घरात रबराचे झाड किंवा रोप कधीही लावू नये.
घराच्या आत आणि आजूबाजूला काटेरी झाडे कधीही लावू नयेत
वास्तुशास्त्रानुसार घराच्या आत आणि आजूबाजूला काटेरी झाडे कधीही लावू नयेत. काटेरी झाडे घरात तणावाचे वातावरण निर्माण करतात. ही झाडे घरात लावल्याने घरातील सदस्यांमधील मतभेद वाढतात.
या झाडामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.
पिंपळाच्या झाडाला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व असले तरी ते घरात किंवा दारात लावणे शुभ मानले जात नाही. या झाडामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. असे मानले जाते की या झाडावर नकारात्मक घटक राहतात. त्यामुळे ते घरात लावू नये. घराच्या भिंतीवर किंवा कोपऱ्यात पिंपळाचे रोप उगवले असेल तर तेही काढून टाकावे.
घरात कडुलिंबाचे रोपही लावू नये.
वास्तुशास्त्रानुसार घरात कडुलिंबाचे झाडही लावू नये. त्यात कटुता आहे. असे मानले जाते की हे घरामध्ये लावल्याने घरामध्ये नकारात्मकता निर्माण होऊ लागते.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
