Pandharpur Wari : माऊलीच्या जयघोषात भाविकांनी नीरा नदी पोहत केली पार, शिवछत्रपती पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ

| Updated on: Jul 06, 2022 | 1:36 PM

17 जूनला पंढरपूरच्या दिशेनं शिवछत्रपती पालखी निघाली होती. ही पालखी इंदापूर तालुक्यातील बावडा या गावी मुक्कामी होती. त्यानंतर या पालखीनं पुढे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी पालखीमधील भाविकांनी नीरा नदी पोहत पार केली.

Pandharpur Wari : माऊलीच्या जयघोषात भाविकांनी नीरा नदी पोहत केली पार, शिवछत्रपती पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ
नीरा नदी पोहून भाविक पंढरपूरकडे मार्गस्थ
Image Credit source: tv9
Follow us on

इंदापूर :आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashiपंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्याची ओढ असंख्य भाविकांना लागली आहे. मराठवाडा (Marathwada), विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यासह राज्यभरातल्या काना कोपऱ्यातून अनेक भाविक पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाले आहेत. किल्ले रायगड येथून 17 जूनला पंढरपूरच्या दिशेनं शिवछत्रपती पालखी निघाली. ही पालखी इंदापूर तालुक्यातील बावडा या गावी मुक्कामी होती. त्यानंतर या पालखीनं पुढे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी पालखीमधील भाविकांनी नीरा नदी पोहत पार केली. पंढरपूरला जाण्याची ही ओढ त्यांच्यात यावेळी दिसत होती. विठ्ठल विठ्ठल करत आणि शिवरायांचा जयघोष करत हे भाविक, वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहेत. शिवछत्रपती पालखी सोहळा यापुढे श्रीपूर, तोंडले, गार्डी, गोदेगाव मार्गे 9 जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून पालखी निघत असल्यानं राज्यात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय.

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची (Tukaram maharaj palkhi 2022) पालखी 9 जुलैला पंढरपूर नगरीत प्रवेश करेल. पंढरपुरात प्रशासनाने आवश्यक त्या सर्व सोयी वारकऱ्यांसाठी केलेल्या आहेत. वारकरी पावसात चिंब भिजत हरिनामाचा जयघोष करीत पंढरपूरच्या (Pandharpur wari 2022) दिशेने वारकरी मार्गस्थ होत आहेत.

भाविकांसाठी पंढरपूरपर्यंत विशेष रेल्वे (Special train for Pandharpur) सोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतलाय. जालना, नांदेड आणि औरंगाबादहून पंढरपूर आणि परतीसाठी विशेष गाड्या चालवल्या जातील. ही विशेष सेवा 07 जुलैपासून सुरु केली जाईल, असे रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. औरंगाबाद, जालना, नांदेड या स्टेशनवरून निघाणाऱ्या गाड्यांमधून वारकरी आणि भक्तांनी योग्य वेळात पंढरपूरला पोहोचावेत, या दृष्टीने रेल्वे विभागाने काळजी घेण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

या आहेत मानाच्या 10 पालख्या

  1. संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर )
  2. संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )
  3. संत सोपान काका महाराज ( सासवड )
  4. संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )
  5. संत तुकाराम महाराज ( देहू )
  6. संत नामदेव महाराज ( पंढरपूर )
  7. संत एकनाथ महाराज ( पैठण )
  8. रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )
  9. संत निळोबाराय ( पिंपळनेर – पारनेर अहमदनगर )
  10. संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड )