AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology Mahashivratri 2022 | तुमच्या शुभ अंकावरुन धारण करा रुद्राक्ष , जाणून घ्या अंकशास्त्र काय सांगतंय ?

अनादी काळापासून, रुद्राक्ष (Rudraksha) त्याच्या दैवी शक्तींमुळे ओळखला जातो. असे म्हणतात की ज्यांच्यावर भगवान शिवाचा (Lord Shiva) आशीर्वाद असतो त्यांनाच ते परिधान करण्याची संधी मिळते.

Numerology Mahashivratri 2022 | तुमच्या शुभ अंकावरुन धारण करा रुद्राक्ष , जाणून घ्या अंकशास्त्र काय सांगतंय ?
numrology
| Updated on: Feb 21, 2022 | 12:10 PM
Share

मुंबई : अनादी काळापासून, रुद्राक्ष (Rudraksha) त्याच्या दैवी शक्तींमुळे ओळखला जातो. असे म्हणतात की ज्यांच्यावर भगवान शिवाचा (Lord Shiva) आशीर्वाद असतो त्यांनाच ते परिधान करण्याची संधी मिळते. “रुद्राक्ष” या शब्दाचा अर्थ रुद्र (शिव) डोळे आणि त्याचे अक्ष (अश्रू ) असा आहे. रुद्राक्ष हे नैसर्गिकरित्या रुद्राक्षाच्या झाडावर उगवणारे एक फळ आहे. प्रार्थना आणि ध्यानासाठी वापरल्या जाणार्‍या आध्यात्मिक (spiritual ) रुद्र मालामध्ये सामान्यतः 108 मणी असतात. हे 1 मुखी ते 27 मुखी विविध स्वरूपात आढळतात. जो कोणी हे मणी धारण करतो त्याला तिन्ही दैवी देवता म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा आशीर्वाद मिळतो असे मानतात. हिंदू धार्मिक ग्रंथानुसार त्रिपुरासुर नावाचा एक राक्षस होता ज्याला दैवी ऊर्जा आणि शक्ती होती. या अनैसर्गिक शक्तींमुळे तो गर्विष्ठ झाला आणि देवता आणि ऋषींना त्रास देऊ लागला. त्याचे अनैतिक कृत्य पाहून देवतांनी त्रिपुरासुराचा वध करण्याची भगवान शिवाची प्रार्थना केली. भगवान शिवाने डोळे मिटून 1000 वर्षांहून अधिक काळ ध्यान केले. शस्त्र मिळवल्यानंतर त्याने त्रिपुरासुराचा वध केला आणि विजयानंतर त्याच्या डोळ्यांतून पृथ्वीवर अश्रू कोसळले. जिकडे त्याचे अश्रू पडले तिथे रुद्राक्षाचे झाड वाढले.

अंकशास्त्रामध्ये 1-9 मधील संख्या असतात. रुद्राक्ष धारण करताना अंकशास्त्राचा उपयोग आपल्या फायद्यासाठी करण्यासाठी, आपल्याला प्रथम आपल्या संख्येचे मूल्यांकन कसे करावे हे माहित असणे आवश्यक आहे.

क्रमांक 1 1, 10, 19 28 रोजी जन्मलेल्या लोकांचा शुभ अंक 1 असतो. त्यांनी 1 किंवा 12 मुखी रुद्राक्ष धारण केले पाहिजे जे सूर्याची शक्ती दर्शवते आणि रुद्राक्षाचे सर्वात शक्तिशाली रूप आहे. 1 मुखी रुद्राक्ष सहसा अढळत नाहीत त्यामुळे खरेदी करताना विशेष काळजी घ्या.

क्रमांक 2 2, 11, 20, 29 रोजी जन्मलेल्या लोकांचा शुभ अंक 2 असतो आणि त्यांनी 2 मुखी रुद्राक्ष धारण केले पाहिजे जे दुर्मिळ आणि महागडे रुद्राक्ष आहे आणि नेपाळी रुद्राक्षात आढळतात. तुम्ही गौरी शंकर रुद्राक्ष देखील धारण करू शकता, जे शिव आणि पार्वती या दोघांचे ऐक्य दर्शवते.

क्रमांक 3 3, 12, 21, 30 रोजी जन्मलेल्या लोकांचा शुभ अंक 3 असतो आणि 5 मुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ ठरते. 5 मुखी रुद्राक्ष 3 पेक्षा कमी वयाच्या लोकांचा अकाली मृत्यू टाळतो.

क्रमांक 4 4, 13, 22, 31 रोजी जन्मलेल्या लोकांचा शुभ अंक 4 असतो. त्यांनी 8 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. अशा लोकांवर राहुचा प्रभाव असतो आणि म्हणून 8 मुखी रुद्राक्ष त्यांच्यासाठी आणि खासकरून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी उत्तम काम करतो.

क्रमांक 5 5, 14, 23 रोजी जन्मलेल्या लोकांचा शुभ अंक 5 असतो. त्यांनी 4 मुखी रुद्राक्ष धारण केले पाहिजेत. अशा लोकांवर बुध ग्रह चालतो आणि म्हणून शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे रुद्राक्ष त्यांच्यासाठी उत्तम काम करतो.

क्रमांक 6 6, 15, 24 रोजी जन्मलेल्या लोकांचा शुभ अंक 6 असतो. आणि त्यांनी 6 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. अशा लोकांवर शुक्राचे वर्चस्व असते आणि 6 मुखी रुद्राक्ष भगवान कार्तिकेयची शक्ती दर्शविते.

क्रमांक 7 7, 16, 25 रोजी जन्मलेल्या लोकांचा शुभ अंक 7 असतो आणि त्यांनी 9 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. अशा लोकांवर केतूचे वर्चस्व असते आणि 9 मुखी रुद्राक्ष देवी दुर्गा शक्ती दर्शवते जी वाईट नजर रोखून त्यांना चांगले जीवन जगण्यास मदत करते.

क्रमांक 8 8, 17, 26 रोजी जन्मलेल्या लोकांचा शुभ अंक 8 असतो. लोक ओळखले जातात आणि त्यांनी 7 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. अशा लोकांवर शनीचे वर्चस्व असते आणि 7 मुखी रुद्राक्ष शक्ती देवी लक्ष्मीला सूचित करतात. आर्थिक कोंडी टाळण्यास हे रुद्राक्ष तुम्हाला मदत करतील.

क्रमांक ९ 9, 18, 27 रोजी जन्मलेल्या लोकांचा शुभ अंक 9 असतो आणि त्यांनी 3 मुखी रुद्राक्ष धारण करावे. अशा लोकांवर मंगळ ग्रहाचे वर्चस्व असते. त्यामुळे हे रुद्राक्ष धारण केल्यास त्याचा फायदाच होईल.

आणखी वाचा :

Video | खासदार संभाजीराजेंच्या गाडीचं स्टेअरींग महिलेच्या हाती! Viral व्हिडीओमागचा इंटरेस्टिंग किस्सा

Viral Video : …म्हणून कधी चुकीचं काम करू नये, रस्त्यावरून भरकटलेल्यांना ‘या’ काकांनी दाखवला योग्य रस्ता

Viral : अन्नाची किती ही नासाडी? IAS अधिकाऱ्यानं शेअर केला लग्नसमारंभातला खाद्यपदार्थांचा Photo

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.