Numerology | अत्यंत श्रीमंत असतात ‘या’ अंकाचे लोक, तुम्ही तर नाही यात

अंकशास्त्रात 9 अंकाला अत्यंत सशक्त मानलं जातं (People Of 9 Radix Are Very Rich). 9, 18, 27 या तारखांना जन्म घेतलेल्या लोकांचा मुलांक 9 असतो.

Numerology | अत्यंत श्रीमंत असतात 'या' अंकाचे लोक, तुम्ही तर नाही यात
अथक परिश्रमानंतर मिळते आठ मूलांकाच्या लोकांना यश; जाणून घ्या अंकशास्त्र

मुंबई : अंकशास्त्रात 9 अंकाला अत्यंत सशक्त मानलं जातं (People Of 9 Radix Are Very Rich). 9, 18, 27 या तारखांना जन्म घेतलेल्या लोकांचा मुलांक 9 असतो. या अंकाचा स्वामी मंगळ असतो, त्यामुळे 9 मुलांक असलेले लोक अत्यंत ऊर्जावान आणि प्रत्येक कामात पुढे असतात. यांच्यामध्ये काहीतरी शिकण्याची इच्छा क्षमता अत्यंत प्रबळ असते आणि हे काही वेळातच कुणाचंही मन जिंकू शकतात. हेच कारण आहे की यांची कुणाशीही फार लवकर मैत्री होते (Numerology Says People Of 9 Radix Are Very Rich).

या अंकाचा स्वामी मंगळ असल्याने यांच्या स्वभावात राग आणि दबंगगिरी देखील असते. परंतू, त्यांच्यातील इतर गुणांमुळे हे स्वत:ला बॅलेंस करतात.या लोकांचा स्वभाग अत्यंत निडर, स्मार्ट, शूर आणि आत्मविश्वासी असतात.

धन-संपत्ती कमी नसते

ज्योतिषशास्त्रानुसार, जमीन, घर आणि शेतीसारख्या क्षेत्रावर मंगळाचं अधिपत्य असते. त्यामुळे 9 मुलांक असलेल्या लोकांना कधीही धन-समृद्धीची कमतरता भासत नाही. बहुतांश घटनांमध्ये असे दिसून येते की 9 मुलांक असलेल्यांकडे जमीन आणि घरे असतात. जर हे लोक कृषी क्षेत्रात काम करत असतील, तर त्या क्षेत्रातही त्यांना बरेच यश मिळते आणि त्यांना खूप नफा होतो.

स्वतंत्र स्वभाव

9 मुलांक असलेले लोक स्वभाव आणि विचाराने स्वतंत्र असतात. त्यांना कोणाच्याही गुलामगिरीत राहायला आवडत नाही, तसेच त्यांना अवास्तविक गोष्टीही आवडत नाहीत. त्यांना प्रत्येक गोष्ट स्वत:च्या मनाप्रमाणे करायला आवडते, तसेच इतरांना स्वतःच्या मनाचे काम करायला लावणे हे देखील त्यांना आवडते. जर ते होत नसेल तर त्यांना राग येतो. त्यांचे वर्तन पूर्णपणे बदलते आणि हे लोक कोणालाही काहीही बोलून बसतात. त्यांच्या या सवयीमुळे ते काही क्षेत्रात थोडे मागेही पडतात. जे 9 अंकाचं लोक जर कोणाशी जवळीक साधतात तर त्या व्यक्तीसाठी काहीही करण्यास तयार असतात आणि प्रामाणिकपणाने नाते निभावतात.

अशाप्रकारे मंगळाचे शुभ प्रभाव मिळतील

मंगळाच्या शुभ प्रभावासाठी 9 मुलांक असलेल्या लोकांनी प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करावे. मंगळवारी लाल, केशरी इत्यादी रंगाचे वस्त्र परिधान करावे पाहिजे आणि कुठलंही शुभ कार्य याच दिवशी करण्याचा प्रयत्न करा.

Numerology Says People Of 9 Radix Are Very Rich

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

कोरोना, लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होममुळे तणाव वाढलाय, ‘या’ मंत्रांचा जप करा…

Zodiac Signs | भावनांवर उत्तम नियंत्रण, या पाच राशींच्या व्यक्तींचा EQ असतो लय भारी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI