Pitru Paksha 2021 : गयामध्ये श्राद्ध आणि पिंडदान केल्याने आत्म्याला मोक्ष प्राप्ती होते, जाणून घ्या पौराणिक महत्त्व

पितृ पक्ष सुरु आहे. या दरम्यान, लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान आणि श्राद्ध करतात. पिंडदान करणारे बहुतेक लोकांची इच्छा असते की त्यांच्या पूर्वजांसाठी पिंडदान गया व्हावे. हिंदू मान्यतेनुसार, पिंडदान आणि श्राद्ध केल्याने व्यक्तीला जन्म आणि मृत्यूपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळतो.

Pitru Paksha 2021 : गयामध्ये श्राद्ध आणि पिंडदान केल्याने आत्म्याला मोक्ष प्राप्ती होते, जाणून घ्या पौराणिक महत्त्व
Pitru-Paksha

मुंबई : पितृ पक्ष सुरु आहे. या दरम्यान, लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान आणि श्राद्ध करतात. पिंडदान करणारे बहुतेक लोकांची इच्छा असते की त्यांच्या पूर्वजांसाठी पिंडदान गया व्हावे. हिंदू मान्यतेनुसार, पिंडदान आणि श्राद्ध केल्याने व्यक्तीला जन्म आणि मृत्यूपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळतो. देशात अनेक ठिकाणी पिंडदान केले जाते, परंतु गयामध्ये पिंडदान करणे हे सर्वात फलदायी मानले जाते. अनेक धार्मिक कथा या ठिकाणाशी संबंधित आहेत.

शास्त्रात असे म्हटले आहे की, श्राद्ध विधी करण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीच्या पूर्वजांना स्वर्ग प्राप्त होतो. कारण भगवान विष्णू स्वतः पितृदेवतेच्या रुपात येथे उपस्थित आहेत.

पौराणिक कथा काय?

पौराणिक कथेनुसार, भस्मासूर नावाच्या एका राक्षसाने कठोर तपश्चर्या केल्यावर, त्याने ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले की तो देवांसारखा शुद्ध होईल आणि त्याच्या केवळ दर्शनाने लोकांचे पाप दूर होतील. या वरदानानंतर जो कोणी पाप करतो तो गायसूरच्या दर्शनाने पापातून मुक्त होऊ लागला. हे सर्व पाहून देवांनी चिंता व्यक्त केली आणि हे टाळण्यासाठी देवांनी गायसूरच्या पाठीवर यज्ञ करण्याची मागणी केली.

जेव्हा गायसूर झोपला तेव्हा त्याचे शरीर पाच कोसपर्यंत पसरले होते आणि तेव्हा देवांनी यज्ञ केलं. यानंतर देवांनी गयासूरला वरदान दिले की जो कोणी या ठिकाणी येऊन आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध आणि तर्पण करेल, त्याच्या पूर्वजांना मोक्ष मिळेल. यज्ञ संपल्यानंतर, स्वतः भगवान विष्णू त्यांच्या पाठीवर एक मोठा खडक ठेवून स्वत: उभे राहिले होते.

गरुड पुराणात असेही म्हटले आहे की श्राद्ध कर्मासाठी जाणाऱ्या व्यक्तीचे प्रत्येक पाऊल पूर्वजांना स्वर्गाच्या दिशेने घेऊन जाते. असे मानले जाते की येथे श्राद्ध केल्याने व्यक्ती थेट स्वर्गात जातो. पुजारींच्या मते, फ्लगू नदीवर पिंड दान केल्याशिवाय हे श्राद्ध अपूर्ण मानले जाते. हा प्रवास पुनपुन नदीच्या तीरापासून सुरु होतो. फाल्गु नदीला स्वतःचा इतिहास आहे. फाल्गु नदीचे पाणी पृथ्वीच्या आतून वाहते आणि बिहारमधील गंगा नदीत सामील होते. फाल्गु नदीच्या काठावर, भगवान राम आणि माता सीता महाराज दशरथच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान अर्पण केले होते.

गयामध्ये वेगवेगळ्या नावांनी 360 वेद्या होत्या, जिथे वेगवेगळ्या नावांनी पिंड दान केले जात होते. त्यापैकी 48 उरल्या आहेत. या जागेला मोक्षस्थळ म्हणतात. दरवर्षी येथे पितपक्षात 17 दिवस मेळा भरतो.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Pitru Paksha 2021 : पितृ पक्षात या गोष्टी दान करा, पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल

Pitru Paksha 2021 : श्राद्ध पक्षात हे 7 संकेत दिसले तर समजा पूर्वजांचे आशीर्वाद मिळणार, धनलाभ होणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI