श्रावणात घराच्या आसपास लावा ‘ही’ रोपं, तुम्हाला कधीच भासणार नाही पैशांची कमतरता
श्रावण महिन्यात भगवान शिव विश्वाचा कारभार हाती घेतात. या पवित्र महिन्यात घरात काही विशेष झाडे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच या झाडांची नियमित पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात. चला तर मग श्रावणात कोणती झाडं लावावीत ते जाणून घेऊयात.

यंदा महाराष्ट्रात श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होत आहे. या महिन्यात निसर्ग हिरवळीच्या चादरीत न्हाऊन निघतो. श्रावण महिन्यात देवांचा देव भगवान शिव सृष्टीची सूत्रे हाती घेतात आणि महिनाभर भाविक भक्त त्यांची पूजा करत असतात. त्याचबरोबर श्रावणात मोठ्या प्रमाणात शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो. श्रावण महिन्यात रुद्राभिषेक करणे देखील अत्यंत फलदायी ठरते. अशातच हिंदू धर्मात काही विशिष्ट वनस्पती आहेत ज्या श्रावणात घरात किंवा घराच्या आसपास लावणे शुभ मानल्या जातात.
धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिन्यात घरात काही विशिष्ट झाडे लावल्याने सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. चला तर मग, श्रावण महिन्यात कोणती झाडे लावणे शुभ मानले जाते ते जाणून घेऊयात.
तुळस
हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. या वनस्पतीचे प्रत्येक घरात पूजा केली जाते. श्रावण आणि कार्तिक महिन्यांत घरात तुळस लावणे सर्वोत्तम मानले जाते. ही वनस्पती घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवते. तुळशीच्या रोपाखाली तुपाचा दिवा लावणे आणि दररोज संध्याकाळी प्रदक्षिणा घालणे शुभ मानले जाते.
केळीचे झाडं
केळीचे झाड हे विश्वाचे रक्षक भगवान विष्णूंचे निवासस्थान मानले जाते. श्रावण महिन्यात आणि दर गुरुवारी घरात केळीचे झाड लावण्याचा सल्ला दिला जातो. घराच्या मागच्या अंगणात नेहमी केळीचे झाड लावण्याचा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की दररोज केळीची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात.
डाळिंबाचे झाडं
श्रावण महिन्यात घरात डाळिंबाचे झाड लावावे. हे झाडं मुख्य प्रवेशद्वारापासून दूर अंतरावर लावणे उत्तम. हे झाड लावल्याने दृष्ट आणि काळ्या जादूपासून संरक्षण मिळते.
शमीचे झाडं
शमीचे झाड शनिदेवांना अत्यंत प्रिय आहे. हे झाड शनिदोष शांत करते असे मानले जाते. हे झाड श्रावण महिन्यात संध्याकाळी किंवा कोणत्याही शनिवारी लावावे. शनिवारी या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील संकटे दूर होतात.
पिंपळाचे झाड
पिंपळाचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते. तथापि ते घराच्या आत लावू नये. ते रस्त्याच्या कडेला किंवा सार्वजनिक ठिकाणी लावणे उत्तम. ते श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी विशेषतः गुरुवारी लावावे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
