लग्नापूर्वी ‘या’ तीन प्रश्नांची उत्तरे विचारा, त्यानंतर… चाणक्य नीतीत असं काय सांगितलं?

लग्नापूर्वी या तीन प्रश्नांची उत्तरे विचारल्यास तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत आणि टिकाऊ राहील, असं चाणक्य सांगतात. विवाह दोन कुटुंबांचा मिलाफ आणि दोन व्यक्तींच्या जीवनाचा नवा अध्याय असतो. काही वेळा, जोडीदारांमध्ये काही गोष्टी स्पष्ट न झाल्यामुळे वैवाहिक जीवनात समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणूनच चाणक्य काही महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा करतात, जे लग्नापूर्वी विचारल्यास तुमच्या भविष्यकाळातील वैवाहिक जीवनाला स्थिरता मिळू शकते.

लग्नापूर्वी 'या' तीन प्रश्नांची उत्तरे विचारा, त्यानंतर... चाणक्य नीतीत असं काय सांगितलं?
चाणक्य नीतीशास्त्राप्रमाणे गाढवाकडून कठोर परिश्रमाचा गुण घेतला पाहिजे. ऋतु कोणताही असो त्याची तमा न बाळगता, प्रत्येकाने संकटांचा सामना तर करावाच पण आपल्या लक्ष्यावरून विचलित होऊ नये.
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 6:30 PM

आपल्याकडे लग्न संस्था ही अत्यंत पवित्र मानली जाते. या नात्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. पती-पत्नी दोघेही या बंधनात अडकल्यानंतर सुखी संसार करू लागतात. त्यांच्या वंशाचा विस्तार करतात. खऱ्या अर्थाने दोन जीवनाचा नवा अध्याय सुरू होतो. परंतु काही वेळा, जोडीदारांमध्ये काही गोष्टी मूक राहिल्यामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळेच आचार्य चाणक्य यांनी विवाहाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितलेल्या या तीन प्रश्नांची उत्तरे लग्नापूर्वी विचारल्यास, भविष्यकाळातील वैवाहिक जीवन सुखी आणि शांततेत राहू शकते.

वयाचं अंतर समजून घ्या :

लग्न करण्यासाठी दोन्ही व्यक्तींचं वय कधीही अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य वयाच्या अंतरावर असलेली जोडपी एकमेकांच्या मानसिकतेला आणि विचारशक्तीला चांगले समजू शकतात. परंतु वयाचं जास्त अंतर असलेल्या जोडप्यांमध्ये विचारांच्या स्तरावर फरक असतो, ज्यामुळे समजून घेण्यात अडचणी येतात. वयाच्या अंतरामुळे संबंध लवकर तुटण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे, विवाहासाठी योग्य वयाचं अंतर आहे का, हे दोन्ही व्यक्तींनी ठरवून विचारले पाहिजे, असं चाणक्य सांगतात.

प्रकृतीची माहिती घ्या :

चाणक्य म्हणतात, ज्याच्या सोबत तुम्ही विवाह करणार आहात, त्याच्या आरोग्याची स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. विवाहापूर्वी जोडीदाराच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल माहिती घेणं महत्त्वाचं आहे. जर त्याला काही आरोग्य समस्या असतील तर भविष्यात त्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. हे माहिती घेऊनच निर्णय घेणं योग्य ठरेल, असे चाणक्य म्हणतात.

जुन्या नात्याबद्दल विचार करा :

मुली किंवा मुलं विवाहासाठी तयार होताना, त्यांच्या जुन्या संबंधांची माहिती घेणं आवश्यक आहे. जर त्यांच्या आधीचे काही नाते होते, तर ते नाते का तुटले? आणि त्या व्यक्तीसोबत सध्या त्यांचे कोणतेही संबंध आहेत का? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हे प्रश्न तुमच्या भविष्यातील वैवाहिक जीवनात कोणत्याही शंका निर्माण होऊ नये म्हणून विचारले पाहिजेत. जर हे सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगितले, तर तुमचा भविष्यकाळाचा संबंध अधिक सुखी आणि शांततेत राहू शकतो.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.