Chandra Grahan: चंद्रग्रहण काळात चुकुनही करु नका ‘या’ चुका, येऊ शकतात अडचणी
Chandra Grahan: चंद्रग्रण काळात चुकुनही करु नका 'या' चुका, जाणून घ्या काय होतील परिणाम, यंदाच्या वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण
Chandra Grahan: यंदाच्या वर्षाचं दुसरं आणि शेवटचं चंद्र ग्रहण सुरु झालं आहे. चंद्रग्रहणाचा कालावधी 4 तास 4 मिनिटं आहे. वर्षातील दुसरे चंद्रग्रहण 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजून 12 मिनिटाला सुरू झालं असून आणि सकाळी 10 वाजून 17 मिनिटाला समाप्त होईल. ग्रहणाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रहण पितृ पक्षात लागलं आहे. भारतात ग्रहण दिसणार नाही. वर्षातील शेवटचं ग्रहण दक्षिणी अमेरिका, पश्चिमी अफ्रिका आणि पश्चिमी युरोप या देशांमध्ये चंद्र ग्रहण दिसणार आहे.
ज्योतिषांनुसार, यंदाच्या वर्षी योगायोगाने चंद्रग्रहण आणि पितृ पक्ष एकाच दिवशी आलं आहे. त्यामुळे ग्रहणाच्या दिवशी अशा काही गोष्टी आहे, ज्या केल्याने अडचणी निर्माण होऊ शकतील. त्यामुळे ज्या ठिकाणी चंद्रग्रहण दिसणार आहे, त्या ठिकाणी राहत असलेल्या लोकांनी सावधान राहण्याची गरज आहे.
चंद्र ग्रहण काळात राग करू नका. नाहीतर पुढील 15 दिवस तुमच्यासाठी अशुभ ठरू शकतात. चंद्रग्रहण काळात भोजन करु नका. भोजन केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतील… असं देखील सांगितलं जातं. ग्रहण काळात कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करु नका. या काळात नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात.
ग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे. ज्योतिषांनुसार, ज्या ठिकाणी चंद्रग्रहण दिसणार आहे, त्याठिकाणी असलेल्या गर्भवती महिलांनी घरातून बाहेर निघू नका. शिवाय कोणत्याही धारदार शस्त्राचा वापर करु नका.
एवढंच नाहीतर, चंद्रग्रहण ज्या ठिकाणी दिसणार आहे, तेथे असलेल्या सुनसान जागी जाणं टाळा… अशी देखली मान्यता आहे. मुळात म्हणजे हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये, यामुळेच सूतककाळही पाळण्याची अजिबात गरज नाहीये.