Putrada Ekadashi 2022: या तारखेला येत आहे पुत्रदा एकादशी, महत्त्व, मुहूर्त आणि पूजा विधी

पुत्रदा एकादशीच्या (Putrada Ekadashi 2022) दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत, जे संततीच्या कामनेसाठी शुभ मानले जातात. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी व्रताच्या दिवशी श्रवणाचा दुसरा सोमवार येत आहे. 

Putrada Ekadashi 2022: या तारखेला येत आहे पुत्रदा एकादशी, महत्त्व, मुहूर्त आणि पूजा विधी
पुत्रदा एकादशी
नितीश गाडगे

|

Aug 04, 2022 | 12:55 PM

एकादशी व्रताला (Ekadashi Vrat) हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. तसेच प्रत्येक एकादशी व्रताला सर्व विधींनी भगवान विष्णूची पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, श्रावण पुत्रदा एकादशी व्रत (putrada ekadashi vrat) दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पाळले जाते. या वर्षी श्रावण  पुत्रदा एकादशी व्रत 8 ऑगस्ट, सोमवारी उदया तिथीला  येणार आहे. पुत्रदा एकादशी व्रत पाळल्याने निपुत्रिक जोडप्यांना संतती सुख मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी पुत्रदा एकादशीच्या (Putrada Ekadashi 2022) दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत, जे संततीच्या कामनेसाठी शुभ मानले जातात. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी व्रताच्या दिवशी श्रवणाचा दुसरा सोमवार येत आहे.

पुत्रदा एकादशीला जुळून येतोय अद्भुत योगायोग

पद्म योग आणि सूर्य योग देखील या दिवशी शुभ संयोग तयार करत आहेत. अशा अद्भुत योगाच्या काळात भगवान विष्णूची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली तर त्याचे पुण्य अनेक पटींनी वाढते. श्रावण सोमवार आणि एकादशी व्रत एकाच दिवशी असल्याने भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची कृपा मिळून इच्छुकांना संतती सुख प्राप्त होईल.

पुत्रदा एकादशीची तिथी आणि शुभ मुहूर्त

  1.  श्रावण पुत्रदा एकादशी तिथीची सुरुवात – 7 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 11.50 वाजता
  2.  श्रावण पुत्रदा एकादशी तिथीची समाप्ती – 8 ऑगस्ट 2022 रात्री 9 वाजेपर्यंत
  3.  श्रावण पुत्रदा एकादशी व्रत- 8 ऑगस्ट 2022 उदया तिथीनुसार

पुत्रदा एकादशीची कथा

प्राचीन काळी महिष्मती नावाच्या एका नगरात महिजित नावाच्या एका धर्मात्मा राजाने आनंदाने राज्य केले. तो राजा अत्यंत शांतीप्रिय, ज्ञानी आणि दानशूर होता. त्या राजाला मुलंबाळ नव्हते, यामुळे तो बऱ्याचदा दु:खी राहायचा. एके दिवशी राजाने आपल्या राज्यातील सर्व ऋषी-मुनी, संन्यासी आणि विद्वानांना बोलावले आणि संतान प्राप्तीचा मार्ग विचारला. तेव्हा एका ऋषींनी सांगितले की, “राजन! पूर्वीच्या जन्मात, श्रावण महिन्याच्या एकादशीच्या दिवशी एक गाय तुझ्या तलावाचे पाणी पीत होती. तुम्ही त्या गायीला तेथून हाकलून लावले. तेव्हा संतापलेल्या त्या गायीने तुम्हाला संतानहीन होण्याचा शाप दिला. यामुळे तुम्हाला आजपर्यंत मुले झालेली नाहीत.”

“जर तुम्ही पत्नीसह पुत्रदा एकादशीला भगवान जनार्दनाची भक्तिभावाने पूजा केली आणि व्रत केले तर या शापाचा प्रभाव दूर होईल.” ऋषींच्या आदेशानुसार राजाने तेच केले. त्यांनी पत्नीसह पुत्रदा एकादशीचा उपवास केला. या उपवासाच्या परिणामामुळे, राणी काही काळातच गर्भवती झाली आणि तिने एका सुंदर आणि तेजस्वी बाळाला जन्म दिला.

पुत्राच्या जन्मामुळे राजा खूप प्रसन्न झाला आणि तो कायम एकादशीचे उपवास करु लागला. असे म्हटले जाते की जो नि:संतान आहे, जर त्या व्यक्तीने हे व्रत शुद्ध अंतःकरणाने पूर्ण केले तर निश्चितपणे त्याची इच्छा पूर्ण होईल आणि त्याला संतान प्राप्ती होईल.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें