AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raksha Bandhan 2022: आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा, महत्त्व आणि मुहूर्त

हिंदू दिनदर्शिकेनुसार,  श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा आज गुरुवार, 11 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.38 वाजता सुरू होत आहे, आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7.05 वाजता समाप्त होईल.

Raksha Bandhan 2022: आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा, महत्त्व आणि मुहूर्त
रक्षाबंधन Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 11, 2022 | 5:40 AM
Share

आज रक्षाबंधन आहे.  हिंदू धर्मात अनेक सण साजरे केले जातात, मात्र भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचे (Raksha Bandhan 2022) वेगळेच महत्त्व आहे. रक्षाबंधन (Raksha Bandhan) हे भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, हा सण दरवर्षी श्रावण (Sharawan Pornima) महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधते  आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तसेच भाऊसुद्धा बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये ‘कजरी-पौर्णिमा’, (Kajri pournima) पश्चिम भारतामध्ये ‘नारळी पौर्णिमा’ (Narali pournima 2022) या नावाने हा सण साजरा करण्यात येतो. राखी या शब्दामध्ये रक्षण कर म्हणजेच सांभाळ कर असा संकेत देण्यात आला आहे.

रक्षाबंधनाचा मुहूर्त

हिंदू दिनदर्शिकेनुसार,  श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा आज गुरुवार, 11 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.38 वाजता सुरू होत आहे, आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7.05 वाजता समाप्त होईल.  यावर्षी 11 ऑगस्ट 2022 रोजी भाऊ-बहिणीचा पवित्र सण रक्षाबंधन साजरा होणार आहे. राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 09.28 ते रात्री 09.14 पर्यंत असेल. यावेळात तुम्ही राखी बांधू शकता.

रक्षा बंधनामागचे शास्त्र

राखी हातावर बांधण्यामागे शास्त्र सांगण्यात आले आहे. आपल्याकडे भारतीय परंपरेत अनेक शास्त्रे सांगितली जातात. सणवार साजरी करण्यामागे  भावनांप्रमाणे शास्त्रेही असतात. त्यापैकीच हे एक शास्त्र आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी यमलहरींचे प्रमाण अधिक असते असे सांगण्यात येते. यमलहरी या पुरूषांच्या देहामध्ये जास्त प्रमाणात गतीमान होतात असा समज आहे. त्यामुळे या यमलहरी देहात चालू झाल्या की, सूर्यनाडी जागृत होऊन त्यांच्या जीवाला त्रास होतो. पण त्याचवेळी राखीचा धागा बांधून या यमलहरींना बंधन घालण्याचे काम बहिणी करतात असे मानले जाते. त्यामुळे एका अर्थी बहिणी आपल्या भावाच्या जीवाचे रक्षण करते असे शास्त्र सांगते. राखीचे बंधन घालून या सूर्यनाडीला शांत करण्याचे काम बहिण करते असे शास्त्रात सांगण्यात आले आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी