Raksha Bandhan 2025 : भावाला राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त, राहु काळात राखी बांधणे टाळाच
देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. यादिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर त्याच्या सुरक्षेसाठी आणि दीर्घायुष्य आयुष्यासाठी राखी बांधते. यंदाच्या रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त नेमका कधी आहे हे जाणून घ्या.

आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. यादिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर त्याच्या सुरक्षेसाठी आणि दीर्घायुष्य आयुष्यासाठी राखी बांधते. चला तर मग जाणून घेऊयात भावाला राखी बांधणाचा शुभवेळ कोणता आहे. यावेळी रक्षाबंधनावर भद्रा काळाचा परिणाम दिसत आहे. या वर्षी रक्षाबंधनाला वैभव आणि सर्वार्थ सिद्धी योग असणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त नेमका कोणता आहे हे जाणून घ्या
9 ऑगस्ट रोजी सकाळी 5:47 ते दुपारी 1:24 पर्यंत भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे. म्हणजेच, काय तर यंदा भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त हा 7 तास 37 मिनिटे आहेत. या काळात तुम्ही भावाला राखी बांधली तर ते अधिक शुभ ठरणार आहे. रक्षाबंधनाचा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हिंदू पंचांगनुसार, यावेळी श्रावण पौर्णिमेची तारीख 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2.12 वाजता सुरू होईल आणि 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1.24 वाजेपर्यंत राहिल.
उदिया तिथीमुळे, रक्षाबंधनाचा सण शनिवार 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जातोय. शास्त्रांमध्ये, भद्रा काळ हा असा अशुभ काळ असल्याचे म्हटले आहे, ज्यामध्ये शुभ आणि शुभ कार्ये करण्यास मनाई आहे. खास करून रक्षाबंधनासारख्या शुभ सणाला, भद्राकाळात राखी बांधणे शुभ मानले जात नाही. यामुळे काही तासच यंदाच्या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. तसे रक्षा बंधनावर भद्राचा परिणाम होणार नाहीये.
हिंदू पंचांगनुसार, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी राहू काळ सकाळी 9:07 ते 10:47 पर्यंत असेल. म्हणजे थोडक्यात काय तर राहू काळाची सावली सुमारे 1 तास 40 मिनिटे राहील. या रक्षाबंधनामध्ये सर्वार्थ सिद्धी योग पहाटे 5:47 ते दुपारी 2:23 पर्यंत असेल. सर्व कार्यांच्या पूर्तीसाठी हा योग सर्वोत्तम मानला जातो. जर तुम्ही या काळात राखी बांधली तर तुमचे नाते आणखी मजबूत आणि समृद्ध होईल. यामुळे शक्यतो आपल्या भावांना याच काळात राखी बांधणे अधि शुभ राहिल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
