Rashifal Of 9th March | मंगळवारी हनुमानजींनी ‘या’ राशींवर कृपा, सर्व समस्या सुटतील

Rashifal Of 9th March | मंगळवारी हनुमानजींनी 'या' राशींवर कृपा, सर्व समस्या सुटतील
Horoscope

आजचा दिवस भगवान हनुमान यांना समर्पित असतो (Rashifal Of 9th March Horoscope Astrology Of Today).

Nupur Chilkulwar

|

Mar 09, 2021 | 8:29 AM

मुंबई : आज 9 मार्च दिवस मंगळवार. आजचा दिवस भगवान हनुमान यांना समर्पित असतो (Rashifal Of 9th March Horoscope Astrology Of Today). या दिवशी जर तुम्ही बजरंगबलीची मनोभावे पूजा कराल तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत, त्या सर्व बजरंगबली सोडवतील. जाणून घ्या आज कोणत्या राशीवर भगवान हनुमानांची कृपा असेल (Rashifal Of 9th March Horoscope Astrology Of Today).

मेष –

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला असणार आहे. नोकरी आणि बिझनेसमध्ये यश मिळण्याचा योग आहे. दुपारच्या सुमारास कुठली शुभ सूचना मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांचा आजचा दिवस चांगला असेल. तुम्ही जेवढी मेहनत कराल त्यानुसार तुम्हाला फळ मिळेल. आर्थिक स्थिति मजबूत राहील. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. आज सायंकाळी कुटुंबातील लोकांसोबत कुठे बाहेर जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो.

वृषभ –

वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला असणार आहे. यशाच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. सकाळच्या वेळी एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. दुपारी प्रवासाचे योग आहेत. तुमचा प्रवास यशस्वी ठरेल. प्रगतीचे मार्ग मोकळा होईल. करिअरमध्ये यश प्राप्त करण्याचे अनेक संधी मिळतील.

मिथुन –

मिथुन राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. धन कमावण्याच्या मार्ग वाढतील. भविष्याबाबत कुठली नवीन योजना होऊ शकते. आई-वडिलांचा आशीर्वाद मिळेगा. आज पैशांची लेन-देन करु नका. धनहानी होण्याची शक्यता आहे. आरोग्यावर थोडं लक्ष ठेवा. बाहेर खाण्या-पिण्यापासून दूर राहा.

कर्क –

कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने चांगला असेल. नोकरीच्या क्षेत्राततुमचा दरारा राहील. दुपारी धन प्राप्तीचे योग आहेत. व्यापार चांगला राहील. नवीन लोकांशी ओळख होऊ शकते. छोट्या व्यापाऱ्यांना अनुकूल परिणाम मिळतील. दाम्पत्य जीवन चांगलं असेल. प्रेम संबंध चांगले राहातील.

सिंह –

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीक असेल. उत्पन्न आणि खर्च समान राहतील. मुलांच्या नकारात्मक कृतींचे परीक्षण करा. छोट्या छोट्या यशामुळे तुम्ही मोठ्या यशाकडे वाटचाल करू शकता. जर तुम्हाला मोठी गुंतवणूक करायची असेल तर काळजीपूर्वक विचार करुन करा. घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कामात शॉर्ट कट अवलंबणे टाळावे, अन्यथा आपल्याला नुकसान सहन करावे लागेल.

कन्या –

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. गाडी चालवताना सावधान राहा. नवीन योजनांकडे आकर्षित होऊ शकता. व्यापार चांगला असेल. नौकरीच्या क्षेत्रात सहकर्मचाऱ्यांचा पूर्ण सहयोग मिळेल. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे नाहीतर कोणाशी वाद होऊ शकतो. आर्थिक स्थितीत तुमचा दिवस चांगला असेल.

तुला –

आज तुला राशीच्या लोकांच्या जीवनात बरेच बदल पाहायला मिळतील. उत्पन्नानुसार खर्चांवर नियंत्रण ठोवणे गरजेचं असेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी खूप मेहनत करावी लागू शकते. आपल्या जन्मकुंडलीतील ग्रह नक्षत्रांच्या स्थानामुळे तुम्हाला परिश्रमांचे पूर्ण परिणाम मिळेल. प्रगती होण्याची शक्यता आहे. जे खासगी नोकरी करतात त्यांचा वेळ चांगला असेल. आपला पगार वाढू शकतो (Rashifal Of 9th March Horoscope Astrology Of Today).

वृश्चिक –

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्यासाठी थोडा कठीण दिसत आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे तुम्ही खूप चिंतीत असाल. एखाद्या महत्त्वाच्या कामात तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. विवाह योग्य लोकांना विवाहाचा प्रस्ताव मिळेल. नवीन लोकांशी मैत्री होण्याची शक्यता आहे, परंतु आपल्या अज्ञात लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. प्रेम जीवनात उतार-चढाव अशी परिस्थिती असेल.

धनु –

धनु राशीच्या लोकांच्या करिअरसाठी आजचा दिवस चांगला असेल. कार्य क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसह आपण नवीन कार्य सुरू करू शकता. व्यवसायात मोठे यश मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याची चिन्हे आहेत. बाहेरचे खाणे-पिणे टाळावे लागेल. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगले यश मिळू शकते.

मकर –

मकर राशीच्या लोकांना आज चांगलं फळ प्राप्त होईल. तुमचं भाग्य तुम्हाला साथ देईल. उत्पन्न वाढू शकते. व्यापाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. पती-पत्नीमध्ये चांगले समन्वय असेल. प्रेम संबंधित प्रकरणात यश मिळण्याची मोठी शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात मान आणि सन्मान प्राप्त होईल.

कुंभ –

कुंभ राशीच्या लोकांना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. परंतु आपण आपल्या सामर्थ्याने प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम असाल. उत्पन्न चांगले असेल. कौटुंबिक गरजा भागू शकतात. नोकरी क्षेत्रात बदली होण्याची शक्यता. आर्थिक जीवनाच्या खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक संकट ओढवू शकतो. कठोर परिश्रमानुसार तुम्हाला फळ मिळेल, म्हणून परिश्रमांवर विश्वास ठेवा.

मीन –

मीन राशीच्या लोकांची वेळ चढ-उताराचा असेल. आज कार्य क्षेत्रात नवीन काहीतरी प्रयत्न करू शकता. गौण कर्मचार्‍यांना पूर्ण सहकार्य मिळेल. उच्च कार्यकारी अधिकारी आपल्या कामाची प्रशंसा करतील. पती-पत्नीमधील मतभेद संपतील. आपण एखाद्या स्त्रीकडे आकर्षित होऊ शकता. प्रेमाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात भाग्याचा साथ मिळेल आणि प्रगती होईल. आपले प्रयत्न आणि कठोर परिश्रम सुरु ठेवा.

Rashifal Of 9th March Horoscope Astrology Of Today

संबंधित बातम्या :

सूर्याचे स्थान बदलणार, पाहा कोणत्या राशींवर ओढवणार संकट, नि कोणत्या राशी होणार मालामाल…

Vijaya Ekadashi 2021 : विजया एकदशीचा काय आहे व्रत, विधी आणि शुभ मुहूर्त, वाचा सविस्तर

Raashifal: ‘या’ राशीच्या व्यक्तींना आज धनलाभाची शक्यता, नोकरीत बढतीचा योग

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें