AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Reiki healing: रेकी हीलिंग थेरपीकडे वाढतोय अनेकांचा कल, जापानी थेरपीची भारतातही क्रेझ

रेकी (Reiki healing) हा जपानी शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘सर्वव्यापी ऊर्जा’ आहे आणि शतकांपूर्वी जपानमध्ये डॉ. मिकाओ उसुई (Dr. mikao usui) यांनी त्याची ओळख करून दिली होती. कोणत्याही रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी केवळ औषधांचीच गरज नसते, नैसर्गिक चिकित्सेनेही  शारीरिक व्याधींवर उपचार करता येतात, हे जपानमध्ये पहिल्यांदा आढळून आले. रेकी – मानवी शरीराला रोगापासून बरे करण्यासाठी वापरले […]

Reiki healing:  रेकी हीलिंग थेरपीकडे वाढतोय अनेकांचा कल, जापानी थेरपीची भारतातही क्रेझ
| Updated on: Jul 19, 2022 | 1:36 PM
Share

रेकी (Reiki healing) हा जपानी शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘सर्वव्यापी ऊर्जा’ आहे आणि शतकांपूर्वी जपानमध्ये डॉ. मिकाओ उसुई (Dr. mikao usui) यांनी त्याची ओळख करून दिली होती. कोणत्याही रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी केवळ औषधांचीच गरज नसते, नैसर्गिक चिकित्सेनेही  शारीरिक व्याधींवर उपचार करता येतात, हे जपानमध्ये पहिल्यांदा आढळून आले. रेकी – मानवी शरीराला रोगापासून बरे करण्यासाठी वापरले जाणारे एक वैकल्पिक उपचार पद्धती आहे. या उपचार पद्धतीनुसार, मानवी शरीरात 7 चक्रे आणि जीवन-ऊर्जा किंवा प्राण आहेत, जे एकमेकांमधून वाहतात. कधी कधी चक्रातील अडथळ्यामुळे मानवी शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. रेकी थेरपी ही चक्रे उघडते आणि जागृत करते, ज्यामुळे शरीराला आराम मिळतो आणि वेदना कमी होतात. गंभीर आजारांसाठी रेकी फायदेशीर आहे का हे शोधण्यासाठी या थेरपीवर अभ्यासही करण्यात आला. हृदयाच्या गतीतील बदल, कोलेस्ट्रॉल पातळी आणि शरीराचे तापमान यावर रेकीचा तात्काळ परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. या थेरपीची भारतातही मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळत आहे. अगदी कॅन्सरग्रस्तसुद्धा या थेरपीचा उपचार घेताना दिसत आहेत.

रेकी थेरपीची 5 तत्त्वे आहेत

रेकी 5 तत्त्वांवर कार्य करते, जर एखाद्या व्यक्तीने हे पर्यायी उपचार वापरले तर त्याला दररोज त्याचा सराव करावा लागतो. तुम्ही किती काळ ते करू शकाल असा विचार करत असल्यास काळजी करू नका, तुम्ही फक्त एका दिवसासाठी रेकी करण्याचा संकल्प करू शकता.

रेकी करण्यापूर्वी फक्त एका दिवसासाठी त्याची 5 तत्त्वे पाळा

  1. रागावू नका
  2. काळजी करू नका
  3. आभार व्यक्त करा
  4. तुमचे काम प्रामाणिकपणे करा
  5. प्रत्येक जिवाबद्दल दया असू द्या

रेकीचे शारीरिक फायदे

तणाव मुक्ती –   आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जगात तणावाचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे अनेक जण गंभीर आजाराच्या उंबरठ्यावर उभे आहेत. तणावापासून मुक्त होण्यासाठी अनेक जण रेकी हीलिंग थेरपी करतात. या थेरपीने तणाव कमी होतो असा अनेकांचा अनुभव आहे.

जुनाट आजारांमध्ये सुधारणा-  कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक जुन्या आजारांवर रेकी फायदेशीर आहे.

नात्यात सुधारणा- रेकी तुम्हाला आध्यात्मिक वाढ आणि व्यक्तिमत्व विकासातही मदत करते. त्याचा वापर करून, तुम्ही तुमच्या समस्या आणि नात्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता. याच्या रोजच्या सरावाने तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता येते आणि कुटुंबातील सदस्यांसोबतचे गैरसमज दूर होतात. तुमच्यात सहिष्णुताही येते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.