कोणी रंग बदलणारे सरडे, कोणी अतिहुशार; तुमचे दात सांगतात तुमचा स्वभाव?
एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहताना, त्याचे दात लक्षपूर्वक पाहिले तर तुम्हाला स्वभावाविषयी अंदाज लावता येतो. सामुद्रिक शास्त्रामध्ये, कोणत्याही व्यक्तीच्या दातांच्या आकारानुसार त्याचे भाग्य, संपत्ती आणि जीवनातील सुख-दु:खाबद्दल सहज सांगता येते.

आपण अनेकदा फोटो काढताना स्माईल प्लीज असे सहज म्हणतो. विशेष म्हणजे एखाद्याने असे म्हटल्यानंतर समोर फोटो काढण्यासाठी उभा असलेला व्यक्ती लगेचच दात दाखवून हसतो. पण तुम्हाला माहितीये का, सामुद्रिक शास्त्राच्या मदतीने तुम्ही एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याच्या शरीराच्या अवयवांवरुन ओळखू शकता. सामुद्रिक शास्त्रात दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीच्या हाता-पायांच्या तसेच विविध अवयवांच्या रचनेवरुन त्या व्यक्तीचा स्वभाव जाणून घेण्यास मदत होते.
फेस रिडिंग करणारे अनेक जण दाताच्या आकारावरून व्यक्तीचा स्वभाव सांगतात. ही कला साधारण तीन हजार वर्षांपूर्वीची आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहताना, त्याचे दात लक्षपूर्वक पाहिले तर तुम्हाला स्वभावाविषयी अंदाज लावता येतो. सामुद्रिक शास्त्रामध्ये, कोणत्याही व्यक्तीच्या दातांच्या आकारानुसार त्याचे भाग्य, संपत्ती आणि जीवनातील सुख-दु:खाबद्दल सहज सांगता येते.
💠लहान दात असलेले लोक : ज्यांचे दात आकाराने खूप लहान असतात, ते लोक खूप लोभी असतात. हे लोक आपल्या स्वार्थासाठी काहीही करु शकतात. हे लोक कामापुरता मामा या प्रकारात मोडतात. या प्रकारच्या व्यक्ती काम असताना खूप चांगले वागतात आणि काम संपल्यानंतर लगेचच रंग बदलतात.
💠रुंद दात असलेले लोक : ज्या व्यक्तींचे दात रुंद असतात, त्या निर्भीड असतात. हे लोक फार धाडसी आणि निडर असतात, त्यांना कशाचीही भीती वाटत नाही. हे लोक स्वाभिमानी असतात. या लोकांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी असते. ते त्यांचं म्हणणं इतरांसमोर फार ठामपणे मांडतात. त्यामुळेच समाजात त्यांना कायम आदर मिळतो.
💠दातांमध्ये जागा असल्यास : ज्या व्यक्तींचा दातांमध्ये जागा असते, असे लोक खूप हुशार असतात. ते इतरांशी चांगले वागतात. पण हे लोक खूप आळशी असतात. हे लोक नेहमीच इतरांवर अवलंबून राहतात.
💠समुद्र शास्त्रानुसार ज्या लोकांचे दात पांढरे आणि सुंदर असतात ते भाग्यवान असतात. या व्यक्तींचा स्वभाव अतिशय मनमिळावू असतो. ते चार लोकांमध्ये कायमच स्वत:च एक वेगळं स्थान बनवतात. या लोकांचा स्वभाव विनोदी असतो. विशेष म्हणजे हे लोक कला तज्ञ आणि कलाप्रेमी आहेत.
💠ज्या व्यक्तींचे दात चौरसाकृती असतात,असे लोक फारच विश्वासू असतात. त्यांच्यावर सहजपणे विश्वास ठेवता येतो. या व्यक्ती फारच व्यवहारिक विचारांच्या असतात. त्यांना वायफळ गप्पा मारण्यात अजिबात रस नसतो. त्या अडचणी सोडवण्यास कायमच पुढे असतात.
💠आयताकृती दात असलेल्या व्यक्ती प्रत्येक गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करुन पावलं उचलतात. या व्यक्ती एखाद्या विषयाचं विश्लेषण फारच चांगल्या शब्दात करतात. तसेच या व्यक्तींची विचारसरणी फारच उच्च दर्जाची असते.
💠ज्या व्यक्तींचे दात त्रिकोणी आकाराचे असतात, त्या व्यक्ती कलात्मक असतात. त्यांना संगीत, कला, लेखन, चित्रकला, यांसारख्या गोष्टींमध्ये खूप रस असतो.
💠तसेच काही लोकांचे दात हे अंडाकृती असतात. या व्यक्ती मनमोकळ्या स्वभावाच्या असतात. ते कोणत्याही परिस्थितीशी सहज जुळवून घेतात. या व्यक्ती स्वतंत्र विचारांचे असतात. या प्रकारच्या व्यक्ती सहज लोकांमध्ये मिसळतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)