Sarva Pitru Amavasya 2021 : पितृदोष दूर करण्यासाठी सर्वपितृ अमावस्येला हे महाउपाय करा

पितृपक्षाच्या अमावास्येला सर्वपितृ अमावस्या म्हणतात. हा दिवस म्हणजे पूर्वजांचा निरोप देण्याचा दिवस. जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख आठवत नसेल, तर तुम्ही पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी या दिवशी विशेषतः श्राद्ध, पिंडदान इत्यादी करु शकता. सर्वपितृ अमावस्या हा सर्व विसरलेल्या लोकांसाठी श्राद्ध करण्याचा सर्वोत्तम दिवस आहे.

Sarva Pitru Amavasya 2021 : पितृदोष दूर करण्यासाठी सर्वपितृ अमावस्येला हे महाउपाय करा
pitru-paksha
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Oct 06, 2021 | 2:55 PM

मुंबई : पितृपक्षाच्या अमावास्येला सर्वपितृ अमावस्या म्हणतात. हा दिवस म्हणजे पूर्वजांचा निरोप देण्याचा दिवस. जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख आठवत नसेल, तर तुम्ही पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी या दिवशी विशेषतः श्राद्ध, पिंडदान इत्यादी करु शकता. सर्वपितृ अमावस्या हा सर्व विसरलेल्या लोकांसाठी श्राद्ध करण्याचा सर्वोत्तम दिवस आहे.

जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल आणि ते तुमच्या नशिबात अडथळा बनत असेल तर ते दूर करण्यासाठी तुम्ही विशेषतः सर्वपितृ अमावस्येला पूजा करु शकता. सर्व दुःख आणि त्रासांपासून मुक्ती मिळवू शकता. सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी कोणते उपाय केल्यास पितृदोष दूर होतो आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो हे जाणून घ्या –

💠 पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वपितृ अमावास्येच्या (Sarva Pitru Amavasya) दिवशी काळे तीळ, पांढरे चंदन, पांढरी फुले पाण्यात मिसळून पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा. यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि ‘ॐ सर्व पितृ देवाय नम:’ या मंत्राचा जप करा.

💠 सर्वपितृ अमावास्येच्या (Sarva Pitru Amavasya) दिवशी पूर्वजांच्या फायद्यासाठी ब्राह्मणाला आपल्या क्षमतेनुसार अन्नपदार्थ, पांढरे कपडे आणि काही दक्षिणा दान करा.

💠 सर्वपितृ अमावास्येच्या (Sarva Pitru Amavasya) दिवशी नदीच्या तीर्थावर जाऊन स्नान करावे आणि पाण्यात काळे तीळ घालून पितरांना अर्पण करावे.

💠 सर्वपितृ अमावास्येच्या (Sarva Pitru Amavasya) दिवशी कच्चे दूध, तीळ, जव आणि तांदूळ मिसळा आणि ते नदीत प्रवाहित करा.

💠 सर्वपितृ अमावास्येच्या (Sarva Pitru Amavasya) दिवशी, एका ब्राह्मणाला घरी बोलावून त्याला आपल्या पूर्वजांच्या आवडीचे सात्विक अन्न अर्पण करा आणि त्याला काही दक्षिणा देऊन आदरपूर्वक निरोप द्या.

💠 सर्वपितृ अमावास्येच्या (Sarva Pitru Amavasya) दिवशी गीतेचा सातवा अध्याय विशेष करुन पठण करा आणि त्याची सर्व गुणकारी फळे तुमच्या पूर्वजांना समर्पित करा. असे केल्याने, पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतील.

💠 यावेळी सर्वपितृ अमावास्या (Sarva Pitru Amavasya) बुधवारी पडत आहे. अशा परिस्थितीत आपल्या पूर्वजांचे स्मरण करुन गाईला हिरवा चारा द्यावा. सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी हा उपाय केल्यास आपले पूर्वज प्रसन्न होतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Pitru Paksha 2021 : पितरांची नाराजी दूर करण्यासाठी पितृपक्षात ही झाडं लावा

Pitru Paksha 2021 : श्राद्धात ब्राह्मणांना जेवण देताना या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा पूर्वज नाराज होऊ शकतात

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें