या आठ जणांना मिळाले आहे चिरंजिवी वरदान, काय आहे पौराणिक कथा?

हिंदू धर्मग्रंथांमध्ये अनेक दैवी पुरुष अमर असल्याचा उल्लेख आहे. या देवपुरुषांबद्दल असे म्हटले जाते की आजही ते पृथ्वीवर आहेत. सात चिरंजीवी देवांचे वर्णन शास्त्रात आढळते.

या आठ जणांना मिळाले आहे चिरंजिवी वरदान, काय आहे पौराणिक कथा?
राजा बळीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 10:30 PM

मुंबई : सनातन धर्म आणि आपल्या वेद  पुराणानुसार, पृथ्वीवर अशा आठ व्यक्ती आहेत, जे चिरंजीवी (Sat chiranjivi) आहेत. ते सर्व कोणत्या ना कोणत्या वचनाने, वरदानाने किंवा शापाने बांधलेले आहेत आणि ते सर्व दैवी शक्तींनी संपन्न आहे. योगामध्ये सांगितलेल्या आठ सिद्धींच्या सर्व शक्ती त्याच्यामध्ये आहेत. सनातन धर्मात सप्त चिरंजीवींना पृथ्वीचे सात महामानव म्हटले आहे. पुराणानुसार सप्त चिरंजीवी कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

आपल्या शास्त्रात एक श्लोक आहे –

अश्वत्थामा बळीर्व्यासो हनुमानश्च विभीषण । कृपा: परशुरामश सप्तते चिरंजीवीं ।

सप्तैतन संसारेन्नित्यं मार्कंडेयमथाष्टमम् । जीवेवर्षद्तं सोपी सर्वव्याधिविर्जित ।

हे सुद्धा वाचा

या श्लोकाच्या पहिल्या दोन ओळींचा अर्थ असा आहे की अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि भगवान परशुराम हे सात महामानव चिरंजीवी आहेत आणि पुढच्या दोन ओळींचा अर्थ असा आहे की या सात महापुरुषांचे आणि आठव्या ऋषी मार्कंडेयांचे रोज स्मरण केले तर शरीरातील सर्व रोग संपतात आणि माणूस शतायुशी होतो.

1. महर्षी परशुराम

परशुराम हा भगवान विष्णूचा सहावा अवतार आहे. परशुरामचे वडील जमदग्नी आणि आई रेणुका. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी  कठोर तपश्चर्या केली. तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवजींनी आपले शस्त्र रामाला दिले. तेव्हापासून राम परशुराम झाला. त्यांचा जन्म वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला झाला होता. म्हणूनच वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. भगवान परशुराम हे श्रीरामाच्या आधी होते, पण चिरंजीवी असल्याने ते श्रीरामाच्या काळातही राहिले. परशुरामाने 21 वेळा पृथ्वीवरून सर्व धर्महीन क्षत्रिय राजांचा नाश केला होता अशी आख्यायीका आहे.

2. राजा बळी

देवांवर हल्ला करण्यासाठी बळी राजाने इंद्रलोकाचा ताबा घेतला होता. राजा बळीचा अभिमान नष्ट करण्यासाठी, भगवंतांनी ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि राजा बळीकडे तीन पद जमीन मागितली. भगवंताने आपले महान रूप धारण करून पृथ्वी आणि आकाश दोन पावलांमध्ये काबिज केले आणि तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळ लोकात पाठवले. शास्त्रानुसार राजा बळी हा भक्त प्रल्हादचा वंशज आहे. श्रीहरी बळीवर खूप प्रसन्न झाले. या कारणास्तव, बळी राजा श्री विष्णूंचे द्वारपाल देखील झाले.

3. हनुमान

अंजनीचा पुत्र हनुमान यांनाही अमर राहण्याचे वरदान मिळाले आहे. रामाच्या काळात ते प्रभू रामाचे निस्सीम भक्त होता. महाभारतात असे संदर्भ आहेत की भीमाने आपली शेपटी मार्गातून काढायला सांगितल्यावर हनुमानजी म्हणतात की ती तू स्वतः बाजूला कर, पण भीमाने आपली सर्व  शक्ती एकवटूनही हनुमानाची शेपूट बाजूला करू शकला नाही. लंकेतील अशोक वाटिकेत श्रीरामाचा संदेश ऐकून हनुमानजी अमर राहतील असा आशीर्वाद सीताजींनी दिला होता.

4. विभीषण

विभीषण हा रावणाचा धाकटा भाऊ आहे. विभीषणजी हा श्रीरामाचा देखील भक्त आहे. जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते, तेव्हा विभीषणाने रावणाला श्रीरामाशी वैर नको म्हणून खूप समजावले होते. याच गोष्टीवरून रावणाने विभीषणाला लंकेतून हाकलून दिले होते. विभीषण श्रीरामाच्या सेवेत गेले.

5. ऋषी व्यास

ऋषी व्यास यांना वेदव्यास म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी चारही वेद, 18 पुराणे, महाभारत, श्रीमद भागवत गीता आणि भविष्यपुराण यांची रचना केली आहे. त्यांना वैराग्याचे जीवन प्रिय होते, परंतु आईच्या सांगण्यावरून त्यांनी विचित्रवीर्याच्या दोन्ही निपुत्रिक राण्यांकडून नियोगाच्या नियमाने दोन पुत्रांना जन्म दिला, ज्यांना धृतराष्ट्र आणि पांडू म्हटले जाते, त्यापैकी विदुर हा तिसराही होता.

6. कृपाचार्य

कृपाचार्य हे अश्वथामाचे मामा आणि कौरवांचे कुलगुरू होते. शिकार करत असताना शंतनूला दोन मुलं सापडली. शंतनूने त्यांना कृपी आणि कृप अशी नावे देऊन वाढवले. महर्षी गौतमाचा मुलगा शरदवन याच्या वेळूवर वीर्य पडल्यामुळे कृपा आणि कृपी यांचा जन्म झाला अशी पौराणिक कथा आहे.

7. ऋषी मार्कंडेय

मार्कंडेय ऋषी हे भगवान शिवाचे परम भक्त होते. त्यांनी आपल्या तपश्चर्येने भगवान शिवाला प्रसन्न केले आणि महामृत्युंजय मंत्र सिद्ध केला. म्हणूनच मार्कंडेय ऋषींचेही रोज स्मरण करायला सांगितले आहे.

8 अश्वत्थामा

गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा आजही श्रीकृष्णाच्या शापामुळे पृथ्वीवर भटकत आहे. महाभारतानुसार अश्वथामाच्या कपाळावर अमरमणी होते. पण अर्जुनने तो अमरमणी बाहेर काढला होता. ब्रह्मास्त्र वापरल्यामुळे, कृष्णाने त्याला शाप दिला होता की तू या पृथ्वीवर कल्पंतापर्यंत राहशील, म्हणूनच अश्वत्थामाची गणना आठ चिरंजीवांमध्ये केली जाते. तो आजही जिवंत आहे आणि त्याच्या कर्मामुळे भटकत आहे असे मानले जाते. मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर आणि हरियाणात त्यांच्या रूपाची लोककथा आजही प्रचलित आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.