Shanidev: शनिची साडेसाती दूर करण्यासाठी ‘हे’ विशेष उपाय करा, महत्त्वाच्या कामामध्ये होईल प्रगती
Shanidev upay: अनेकदा तुमच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडतात ज्यामुळे तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम दिसून येतात. शनिदेव अनेकलेकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी त्यांची परिक्षा घेतात. जर तुम्हालाही शनिदेवाच्या साडेसाती किंवा शनिच्या धैय्याचा त्रास होत असेल तर काही विशेष उपाय नक्की करा.

हिंदू धर्मामध्ये आपल्या कुंडलीतील ग्रहांच्या आधारावर जीवनातील सर्व घटना घडत असतात. कुंडलीतील ग्रहांचे स्थान बदलल्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात. हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार, शनिदेवाला न्यायाचे देवता मानले जाते. शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मांनुसार फळ देतात. परंतु तुमच्या कुंडलीतील शनिच्या दोषामुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे येत असतील आणि तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फळ मिळत नसेल तर तमच्या जीवनामध्ये शनिची साडेसाती किंवा शनिचा धैय्या सुरू असण्याची शक्यता असते. शनिदेव लोकांना चांगले कर्म करण्यासाठी आणि योग्य मार्गावर आणण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये जास्त प्रमाणात अडथळे अणतात.
हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, शनिदेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि तुमच्या कामांमध्ये तुमची प्रगती होण्यास मदत होते. तुमच्या कुंडलीमध्ये शनिदेवाची साडेसाती असेल आणि शनिच्या स्थितीमुळे त्रस्त असाल तर काही विशेष उपाय नक्की करा ट्राय. या सर्व उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होतात त्यासोबतच तुमच्या आयुष्यामध्ये तुमची प्रगती होण्यास मदत होते.
धार्मिक ग्रंथानुसार, शनिदेवाची शनिवारी पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडण्यास सुरूवात होते आणि काही खास उपाय केल्यास तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकतात आणि आयष्यातील सर्व समस्या कमी करू शकतात. शनिदेव नेहमी अशा लोकांना पाठिंबा देतात ज्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी करतात आणि कोणत्याही चुकीच्या कामामध्ये सहभागी होत नाही. त्यामुळे आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये सांगितले आहे की, तुमच्या जीवनामध्ये वाईट संगतीपासून स्वत:ला दूर ठेवा त्यासोबतच तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये देवाची पूजा आणि दान करा. ग्रंथानुसार, शनिदेव महादेवाला त्यांचे दैवत मानतात, त्यामुळे शनिदेवासह महादेवाची पूजा करा. महादेवाची मनापासून पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनामधील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.
शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय….
शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी त्यांची पूजा करा.
शनिवारी, शनि मंदिरात जा आणि त्यांच्या मूर्तीवर मोहरीचे तेल अर्पण करा.
शनिवारी चंद्रासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, त्यात काळे तीळ आणि काळे उडद घाला.
शनिदेवाच्या मंत्राचा जप अवश्य करा “ओम शं शनैश्चराय नमः”
गरजूंची नक्कीच सेवा करा, काळे बूट, चप्पल, ब्लँकेट दान करा.
शनिवारी काळे तीळ, लोखंड, उडीद आणि तेल दान करा
डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.
