AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shardiya Navratri 2021 | आज नवरात्रीचा पहिला दिवस, जाणून घ्या देवी शैलपुत्रीची कथा

नवरात्रीचा (Shardiya Navratri 2021) पवित्र सण आजपासून सुरु होत आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या तारखेपासून नवमी तिथीपर्यंत नऊ दिवस नवरात्रीचे व्रत देवी दुर्गाला समर्पित आहे. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या दिवशी देवी दुर्गाचं पहिलं स्वरुप शैलपुत्री रुपाची पूजा केली जाते. नवरात्रीदरम्यान नऊ दिवस देवी दुर्गाच्या नऊ स्वरुपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लोक घरात घटस्थापना करतात.

Shardiya Navratri 2021 | आज नवरात्रीचा पहिला दिवस, जाणून घ्या देवी शैलपुत्रीची कथा
Mata-Shailputri
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 2:22 PM
Share

मुंबई : नवरात्रीचा (Shardiya Navratri 2021) पवित्र सण आजपासून सुरु होत आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या तारखेपासून नवमी तिथीपर्यंत नऊ दिवस नवरात्रीचे व्रत देवी दुर्गाला समर्पित आहे. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या दिवशी देवी दुर्गाचं पहिलं स्वरुप शैलपुत्री रुपाची पूजा केली जाते. नवरात्रीदरम्यान नऊ दिवस देवी दुर्गाच्या नऊ स्वरुपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लोक घरात घटस्थापना करतात.

देवी शैलपुत्री यांना देवी पार्वतीचं आणखी एक स्वरुप मानलं जातं. माहितीनुसार, देवी शैलपुत्रीचे चार हात असतात आणि त्या नंदीवर (बैल) सवार असतात. त्या पार्वती, हेमवती, सती, भवानी इत्यादी नावानेही ओळखल्या जातात. शैलपुत्री शब्दाचा अर्थ पहाडांची कन्या आहे.

देवी शैलपुत्रीची पूजा विधी

सकाळी स्नान करावं आणि या दिवशी देवी शैलपुत्रीच्या मूर्तीची पूजा करावी. देवी शैलपुत्रीच्या मंत्रांचाही जप करावा आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी देवीची आरती करावी.

या दिवशी या मंत्राचा जप करावा –

या देवी सर्वभूतेषु मां शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

ओम देवी शैलपुत्रायै नमः

सर्वस्वरूपे सर्वेशे, सर्व शक्ति समन्विते भये भ्यास्त्राहि नो देवि, दुर्गे देवी नमोस्तुते

एतत् वदं सौमं लोचनं त्राहुशीतम् पातु नः सर्वभूताभिः कात्यायनी नमोस्तुते ज्वाला करला मत्युग्रामम् शेषासुर सुदणम् त्रिशुलम पातु न भितर भद्रकाली नमोस्तुते

देवी शैलपुत्रीची कथा –

हिंदू पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीचा जन्म त्यांच्या पूर्व जन्मातील देवी सतीच्या रुपात झाला आणि त्यांनी पिता दक्ष प्रजापतीमुळे यज्ञ कुंडात उडी घेऊन मृत्यूला कवटाळलं. एक दिवशी सतीच्या पितांनी सर्वांना एक भव्य यज्ञात आमंत्रित केलं होतं. पण त्यांनी भगवान शिवला फक्त त्यांचा अपमान करण्यासाठी आमंत्रण दिलं नाही. त्यामुळे देवी सतीने त्याच यज्ञात स्वत:ला भस्म केलं.

त्यानंतर त्यांनी पर्वत राजाची मुलगी पार्वती म्हणून जन्म घेतला आणि त्यांनी ध्यान केलं आणि प्रार्थना केली जेणेकरुन त्या भगवान शिवसोबत विवाह करु शकतील. ध्याननंतर, एक दिवस भगवान ब्रह्मा त्यांच्यापुढे प्रकट झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला की भगवान शिव त्यांच्याशी विवाह करतील.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shardiya Navratri 2021 : आजपासून नवरात्रीला सुरुवात, उपवास ठेवण्यापूर्वी ही कामं करुन घ्या

Shardiya Navratri 2021 : आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात, जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि पद्धत

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.