Shardiya Navratri 2021 : आजपासून नवरात्रीला सुरुवात, उपवास ठेवण्यापूर्वी ही कामं करुन घ्या

नवरात्रीचा (Shardiya Navratri 2021) पवित्र सण आजपासून सुरु होत आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या तारखेपासून नवमी तिथीपर्यंत नऊ दिवस नवरात्रीचे व्रत देवी दुर्गाला समर्पित आहे. नवरात्रीच्या उपवासाच्या नऊ दिवसांचे विशेष महत्त्व आहे. बरेच लोक नवरात्रीचे व्रत काहीही न खाता किंवा न पिता ठेवतात. त्याचबरोबर काही लोक फळ घेऊन उपवास ठेवतात.

Shardiya Navratri 2021 : आजपासून नवरात्रीला सुरुवात, उपवास ठेवण्यापूर्वी ही कामं करुन घ्या
Shardiya-Navratri
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Oct 07, 2021 | 12:40 PM

मुंबई : नवरात्रीचा (Shardiya Navratri 2021) पवित्र सण आजपासून सुरु होत आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या तारखेपासून नवमी तिथीपर्यंत नऊ दिवस नवरात्रीचे व्रत देवी दुर्गाला समर्पित आहे. नवरात्रीच्या उपवासाच्या नऊ दिवसांचे विशेष महत्त्व आहे. बरेच लोक नवरात्रीचे व्रत काहीही न खाता किंवा न पिता ठेवतात. त्याचबरोबर काही लोक फळ घेऊन उपवास ठेवतात. नवरात्रीच्या काळात दररोज देवी दुर्गाच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, यावेळी नवरात्रोत्सव आज गुरुवारी 07 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे.

अनेक लोक नवरात्रीच्या काळात घरात घटस्थापन करतात. या नऊ दिवसांमध्ये भक्तांना अनेक नियमांचे पालन करावे लागते. देवी दुर्गाच्या आगमनापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया –

1. नवरात्रीच्या उपवासात पूर्णपणे सात्विक अन्न खावे. लसूण आणि कांदा जेवणात वापरु नये. या व्यतिरिक्त, कोणालाही वाईट बोलू नये.

2. देवी दुर्गाच्या आगमनापूर्वी घर स्वच्छ करा. ज्या घरात घाण असते तिथे देवीची कृपा नसते असे मानले जाते. म्हणूनच नवरात्रोत्सवात घराची स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे. घरातील पूजेचे ठिकाण पूर्णपणे स्वच्छ करा आणि गंगाजल शिंपडा. असे केल्याने तुमचे घर पवित्र होईल.

3. नवरात्रीमध्ये रंगांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातले जातात. याशिवाय घरात उपवासाच्या वस्तू अगोदरच ठेवा. यासाठी शिंगाड्याचे पीठ, भगर, साबुदाणा, सेंदे मीठ, फळे, शेंगदाणे, मखाणा इत्यादी मागवून ठेवा.

4. घराच्या ज्या भागामध्ये देवीची चौकी स्थापन केली आहे त्याच्या समोर स्वस्तिक चिन्ह बनवा. या व्यतिरिक्त, कलश स्थापनाचे पूजन साहित्य एकाच ठिकाणी गोळा करा जेणेकरून पूजेच्या वेळी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

5. नवरात्री सुरु होण्याआधी, मांसाहारी वस्तू घरातून काढून टाका. पुढील नऊ दिवस या गोष्टींचे सेवन करु नये.

6. जर तुम्ही केस, दाढी कापण्याचा विचार करत असाल तर नवरात्रीपूर्वी ते कापून घ्या. नवरात्रीमध्ये या सर्व गोष्टी करणे अशुभ मानले जाते. याशिवाय नखे चावणे देखील निषिद्ध मानले जाते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

अंबाबाईच्या मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी, मंदिर प्रशासनाचं ‘कायद्यावर बोट’

Shardiya Navratri 2021 : नवरात्रोत्सव का साजरा केला जातो? जाणून घ्या पौराणिक कथा आणि महत्त्व

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें