Shrawan 2023 : श्रावण महिन्यात का करू नये मांसाहार, हे आहे शास्त्रीय कारण

श्रावण महिना हा आध्यात्मिक दृष्ट्या जितका महत्त्वाचा आहे तितकाच आरोग्यासाठीही महत्त्वाचा मानला जातो. या काळात मांसाहार करण्यास मनाई करण्यात येते. यामागे शास्त्रीय कारण काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Shrawan 2023 : श्रावण महिन्यात का करू नये मांसाहार, हे आहे शास्त्रीय कारण
मांसाहारImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 10:08 PM

मुंबई : धार्मिक दृष्टीकोणातून श्रावण महिन्याचे (Shrawan 2023) अनन्यासाधारण महत्त्व आहे. त्याच प्रमाणे आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही हा महिना महत्त्वाचा मानल्या जातो . या ऋतूत भगवान शंकराच्या उपासनेमुळे धार्मिक दृष्टिकोनातून मांसाहार निषिद्ध आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही या महिन्यात मांसाहार करू नये. या महिन्यात हलका पाऊस पडतो. वातावरणात बुरशी आणि विषाणूंचे संक्रमण वाढू लागते. अन्नपदार्थ लवकर खराब होऊ लागतात, कारण सूर्य-चंद्राच्या प्रकाशाची कमतरता असते, त्यामुळे अन्नपदार्थ लवकर संक्रमित होतात.

पचनशक्ती कमकुवत होते

श्रावण महिन्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे आर्द्रता आणि ओलसरपणा वाढतो, ज्यामुळे आपली पचनशक्ती कमजोर होते. मांसाहार पचायला जास्त वेळ लागतो. कमकुवत पचनशक्तीमुळे मांसाहारी अन्न आतड्यांमध्ये सडण्यास सुरुवात होते. पोट जड वाटू लागते. आपले संपूर्ण शरीर आपल्या पाचक अग्नीवर अवलंबून असल्यामुळे आपले आरोग्य बिघडते. अग्नीच आपल्या शरीरातील सात धातू बनविण्यास सक्षम आहे. दुसऱ्या शब्दांत, पाचक अग्नीच आपल्या सात धातूंची गुणवत्ता ठरवते.

प्राणी देखील आजारी पडतात

वातावरणात कीटक आणि विषाणूंची संख्या वाढते. डेंग्यू, चिकनगुनियासारखे अनेक आजार होऊ लागतात, ज्यामुळे जनावरेही आजारी पडतात. त्यांचे मांस खाणे हानिकारक आहे.

हे सुद्धा वाचा

आपली पाचक अग्नी काय आणि कशी असते

  • सम अग्नि: यामध्ये आपली पचनक्रिया सामान्य असते, अन्न पचायला 5 ते 6 तास लागतात.
  • मंद अग्नि: यामध्ये पचनास 7 ते 8 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो, ज्यामुळे आपले अन्न आतमध्ये सडते आणि अनेक रोग होतात. यावेळी उशिरा पचणारे अन्न घेऊ नये. जनावरे जे गवत खातात, त्यासोबत अनेक विषारी किडे खातात, त्यामुळे जनावरे आजारी पडतात. त्यांनाही संसर्ग होतो. प्राण्यांचे मांस शरीरासाठी अत्यंत हानिकारक असल्याचे सिद्ध होते.
  • विषम अग्नि: अन्न पचायला ६ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. श्रावण महिन्याच्या काळात मासे अंडी घालतात, त्याचे सेवन हानिकारक असते. याच्या सेवनाने आजार होण्याचा धोका असतो. हा काळ गर्भधारणेचा आणि इतर प्राण्यांच्या पुनरुत्पादनाचा असतो. त्यांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात, यावेळी मांसाहार योग्य नसतो.

या ऋतूत कोणत्या औषधी वनस्पतींचे सेवन करावे

श्रावण महिन्यात गिलोय, कडुलिंब, तुळशी, चित्रक, दालचिनी, पिपली, बडीशेप, खडे मीठ खावे जेणेकरून पचनशक्ती चांगली राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.