AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोमवती अमावस्येच्या दिवशी एक दुर्मिळ योगायोग, स्नान आणि दानाचा मोठा दिवस असल्याने ‘या’ गोष्टी करा दान

या वर्षीच्या पहिल्या सोमवती अमावस्येला एक दुर्मिळ योग जुळून येत आहे, ज्यामुळे हा दिवस स्नान आणि दान करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. या दिवशी स्नान आणि दान केल्याने दुप्पट लाभ मिळतो, ग्रहदोष व पापे दूर होतात आणि मोक्षप्राप्ती होते. चला तर मग आजच्या लेखात आपण सोमवती अमावस्याच्या दिवशी कोणत्या वस्तू दान कराव्यात ते जाणून घेऊयात.

सोमवती अमावस्येच्या दिवशी एक दुर्मिळ योगायोग, स्नान आणि दानाचा मोठा दिवस असल्याने 'या' गोष्टी करा दान
bholenath
| Edited By: | Updated on: Jun 25, 2026 | 1:37 PM
Share

यावर्षी सोमवती अमावस्या ज्येष्ठ अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला येत आहे. हा दिवस स्नान आणि दान करण्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. त्याचबरोबर पुण्यप्राप्तीसाठी सुद्धा एक उत्तम संधी आहे. या वर्षीच्या सोमवती अमावस्येच्या या दुर्मिळ योगायोगाने स्नान आणि दान करून तुम्ही तुमचे दुःख, वेदना आणि पापे दूर करू शकता, तसेच ग्रहदोषही दूर होतील. चला जाणून घेऊया की सोमवती अमावस्येला कोणता दुर्मिळ योग जुळत आहे. सोमवती अमावस्येला कोणत्या वस्तूंचे दान करावे?

सोमवती अमावस्या हा दुर्मिळ योगायोग

सोमवती अमावस्या सोमवार 15 जून रोजी आहे. हा दिवस स्वतःच पुण्यकारक आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी बहुतेकजण उपवास करतात, भगवान शिवाची पूजा करतात, स्नान आणि दान करतात. यावेळी सोमवती अमावस्या आणि मिथुन संक्रांती यांचा दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी जेव्हा सूर्यदेव वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करतील, तेव्हा मिथुन संक्रांती होईल.

शिवाय ही सोमवती अमावस्या अधिक मासात येते, जी दर तीन वर्षांनी एकदा येतो. याचे अधिष्ठाता दैवत भगवान विष्णू आहेत. म्हणूनच याला पुरुषोत्तम मास म्हटले जाते. अधिक मासातील सोमवती अमावस्या ही भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याची एक उत्तम संधी आहे.

सोमवती अमावस्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग देखील तयार होत असतात. हे दोन्ही शुभ योग सकाळी 5 वाजून 23 मिनिटांनी सुरू होते ते सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांपर्यंत चालतात. सर्वार्थ सिद्धी योगाच्या काळात केलेले कोणतेही कार्य यशस्वी होते. या दिवसात केलेले स्नान आणि दान फलदायी ठरते.

स्नान आणि दान केल्याने दुप्पट लाभ मिळतो

यावर्षी सोमवती अमावस्येला स्नान आणि दान केल्यास दुप्पट लाभ मिळते. कारण सोमवती अमावस्या मिथुन संक्रांतीच्या दिवशीच येत आहे. मिथुन संक्रांतीच्या दिवशीही स्नान आणि दान करणे विहित आहे. त्यामुळे 15 जून रोजी स्नान आणि दान केल्यास मिथुन संक्रांती आणि सोमवती अमावस्येचे दुप्पट लाभ मिळतील.

सोमवती अमावस्येला काय दान करावे?

सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर तुम्ही अन्न, वस्त्र, ब्लँकेट, पंखे, छत्र्या इत्यादींचे दान करावे. ही सोमवती अमावस्या अधिक मासात (ज्येष्ठ महिन्यात) येत असल्यामुळे पाणीदान अवश्य करा. तहानलेल्या व्यक्तीला, प्राण्याला किंवा पक्ष्याला पाणी द्या. असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूच्या आशीर्वादाने मोक्ष प्राप्त होईल.

सोमवती अमावस्या मिथुन संक्रांतीच्या दिवशीच येते म्हणून सूर्याचा शुभ प्रभाव प्राप्त करण्यासाठी गहू, गूळ, लाल फळे, लाल फुले, केशरी किंवा लाल रंगाचे कपडे, लाल चंदन, केशर, तांबे इत्यादींचे दान करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील सूर्याचा प्रभाव दूर होईल आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी संधी मिळतील.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...