Somvati Amavasya 2021 | सोमवती अमावस्या कधी, जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्त…

यावेळी अमावस्या सोमवारी येत आहे. म्हणून त्याला 'सोमवती अमावस्या' (Somavati Amavasya) असे म्हणतात.

Somvati Amavasya 2021 | सोमवती अमावस्या कधी, जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्त...
Sombvati amavasya

मुंबई : हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथींना विशेष असं महत्त्व आहे. दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिथीवर अमावस्या येते. यावेळी अमावस्या सोमवारी येत आहे. म्हणून त्याला ‘सोमवती अमावस्या’ (Somavati Amavasya) असे म्हणतात. सोमवारचा दिवस भगवान शंकर यांना समर्पित असतो. या दिवशी शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते. त्याचबरोबर काही लोक सोमवारी उपवासही ठेवतात. यावेळी अमावस्या सोमवारी आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे (Somvati Amavasya 2021 Know The Importance And Shubh Muhurt Of Somvati Amavasya).

अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करुन दान-पुण्य करावे. या दिवशी दान केल्यास घरात आनंद आणि समृद्धी येते. चला सोमवती अमावस्येच्या शुभ मुहूर्ताबद्दल आणि महत्त्वाबद्दल जाणून घेऊया.

सोमवती अमावस्या शुभ मुहूर्त

अमावस्या तिथीची सुरुवात – 11 एप्रिल 2021 ला रविवारी सकाळी 6 वाजेपासून ते 12 एप्रिल 2021 ला सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत असेल

सोमवती अमावस्येचे महत्त्व

सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात. याशिवाय पितरांना तर्पणदेखील दिले जाते. यामुळे तुम्हाला पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो. मान्यता आहे की, जर कुणाच्या कुंडलीत पितृदोष असेल तर या दिवशी पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते. या दिवशी विधीवत पूजा केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळते. याशिवाय, सोमवार असल्याने महादेवाची पूजा अवश्य करावी.

काय उपाय करावे?

1. सोमवती अमावस्येला पवित्र नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. पवित्र नदीत स्नान करू शकत नसल्यास पाण्यात गंगाजल मिसळा आणि त्या पाण्याने स्नान करा. यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. असे केल्याने आपण आजारांपासून दूर राहातो.

2. मान्यता आहे की भगवान विष्णू पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. यामुळे घरात सुख आणि समृद्धी नांदते.

3. या खास दिवशी शिव आणि पार्वतीसोबतच तुळशीच्या झाडाची पूजा करावी. सोमवती अमावस्येच्या दिवशी, तुळशीच्या झाडाच्या भोवती 108 वेळा प्रदक्षिणा करावी. असे केल्याने घरात पैशांची अडचण होत नाही.

Somvati Amavasya 2021 Know The Importance And Shubh Muhurt Of Somvati Amavasya

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Sheetala Ashtami 2021 | कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक संकट दूर करण्यासाठी करा शीतला अष्टमी व्रत

‘हे’ संकेत दिसले तर समजा तुमच्यावर शनिचा प्रकोप, ‘या’ उपायांनी होणार बचाव…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI