Sheetala Ashtami 2021 | कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक संकट दूर करण्यासाठी करा शीतला अष्टमी व्रत

चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्ष अष्टमीच्या तिथीला शीतला अष्टमी (Sheetala Ashtami) साजरी केली जाते. संपूर्ण उत्तर भारतात या दिवशी देवी शीतलाची पूजा केली जाते.

Sheetala Ashtami 2021 | कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक संकट दूर करण्यासाठी करा शीतला अष्टमी व्रत
Sheetala Ashtami
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 10:19 AM

मुंबई : चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्ष अष्टमीच्या तिथीला शीतला अष्टमी (Sheetala Ashtami) साजरी केली जाते. संपूर्ण उत्तर भारतात या दिवशी देवी शीतलाची पूजा केली जाते. तसेच, त्यांचा या दिवशी शिळ्या अन्नाचं नैवेद्य दाखवलं जातं. त्यामुळे शीतला अष्टमीला बसौडा अष्टमीच्या नावानेही ओळखलं जातं. या दिवशी शीतला देवीला हलवा पूरीचं नैवेद्य लावलं जातं. आज म्हणजेच 4 एप्रिलला शीतला अष्टमी आहे. चला जाणून घेऊ याबाबत अधिक माहिती (Sheetala Ashtami 2021 Importance Know The Muhurt And Vrat Katha)-

मान्यता आहे की शीतला देवीला थंड पदार्थ आवडतात, त्यामुळे त्यांना दाखवण्यात येणारं नैवेद्य एक दिवसाआधीच सप्तमीला तयार केलं जातं आणि देवीला थंड नैवेद्य दाखवलं जातं. अष्टमीला प्रसाद म्हणूनही शिळ अन्नच खाल्ल जातं. अशी देखील मान्यता आहे की बसौडा अष्टमीचा दिवस हा शिळं अन्न खाण्याचा शेवटचा दिवस असतो. कारण, या दिवसापासून उन्हाळ्याला सुरुवात होते. त्यानंतर उष्णतेमुळे अन्न जास्त काळ चांगलं राहात नाही.

उपवास केल्याने कुटुंबाचा या आजारांपासून होतो बचाव

मान्यता आहे की ज्या महिला शीतला अष्टमीच्या दिवशी उपवास ठेवतात, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि लहान मुलांना चिकन पॉक्स, गोवर, कुठलाही गंभीर प्रकारचा ताप, डोळ्यांचे आजार आणि थंडीमुळे होणारे इतर आजार होत नाही. देवी शीतला कुटुंबाचा या आजारांपासून बचाव करते. त्याशिवाय, देवीची विधीवत पूजा केल्याने आणि उपवास ठेवल्याने गरीबी दूर होते.

पूजा विधी

अष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करुन देवी शीतलापुढे उपवासाचा संकल्प घ्या. त्यानंतर त्यांनी रोली, अक्षता, जल, पुष्प, वस्त्र, दक्षिणा आणि प्रसाद चढवा. त्यानंतर शीतला स्त्रोताचं पठन करा. व्रत कथा वाचा आणि आरती करा. देवीकडे कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करा. दिवसभर उपवास ठेवा. सायंकाळी देवीला दाखवलेला प्रसाद खाल्ल्यानंतर उपवास सोडा.

शीतला अष्टमी व्रत कथा –

पौराणिक कथेनुसार, एके दिवशी देवी पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी निघाली. देवीने एका वृद्धेचं रुप धारण केलं आणि राजस्थानच्या डुंगरी गावात त्या पोहोचली. जेव्हा देवी रस्त्याने जात होती तेव्हा तिच्यावर कुणीतरी भाताचं उकळतं पाणी टाकलं. यामुळे देवी भाजली आणि तिच्या शरीरावर व्रण पडले. त्यामुळे होणाऱ्या असह्य जळजळमुळे देवी त्रस्त होती. तिने गावातील लोकांना मदत मागितली. पण तिचं कुणीही ऐकलं नाही. तेव्हा गावातील एका कुंभाराच्या कुटुंबातील महिला देवीजवळ आली आणि देवीला घरी घेऊन गेली (Sheetala Ashtami 2021 Importance Know The Muhurt And Vrat Katha).

तिने थंड पाणी देवीवर टाकलं तेव्हा देवीचा त्रास कमी झाला. त्यानंतर कुंभारीन महिलेने रात्रीचा दही आणि ज्वारीची रबडी खायला दिली. यामुळे देवीच्या शरीराला थंडावा मिळाला. त्यानंतर या महिलेने देवीला म्हटलं की तुमच्या विखुरलेल्या केसांना मी वेणी घालून देते. ती देवीच्या केसांची वेणी गुंफू लागली. तेव्हा तिला केसांच्या खाली लपलेला तिसरा डोळा दिसला. हे पाहून महिला घाबरली आणि तेथून पळू लागली. तेव्हा देवी म्हणाली की बेटा घाबरु नकोस मी शीतला देवी आणि पृथ्वीवर हे पाहण्यासाठी आली होती की माझी खरी पूजा कोण करते. त्यानंतर देवीने महिलेला आपलं मूळ स्वरुपाचं दर्शन दिलं.

महिला देवीसमोर रडू लागली आणि म्हणाली की देवी मी अत्यंत गरीब आहे माझ्याकडे तुम्हाला बसवण्यासाठी स्वच्छ जागा देखील नाही. यावर देवी माता हसली आणि तिथे असलेल्या गाढवावर जाऊन विराजमान झाली. त्यानंतर देवीने झाडूने महिलेच्या घराची साफ-सफाई केली आणि घाणीच्या स्वरुपात घरातील दरिद्रतेला एका टोपलीत टाकून बाहेर फेकून दिलं.

त्यानंतर देवीने महिलेला वरदान मागण्यास सांगितलं. तेव्हा महिला म्हणाली की देवी तुम्ही आमच्या डुमरी गावात निवास करा आणि जी कोणी व्यक्ती तुमची श्रद्धेने अष्टमीची पूजा करेल आणि उपवास ठेवेल आणि तुम्हाला थंड नैवेद्य दाखवेल त्याची गरीबी दूर होईल. त्यानंतर देवीने तिला अखंड सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देत म्हटलं की असंच होईल. तेव्हापासून आजपर्यंत शीतला अष्टमीच्या दिवशी देवीला थंड नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.

Sheetala Ashtami 2021 Importance Know The Muhurt And Vrat Katha

संबंधित बातम्या :

भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वियोग का झाला होता? जाणून घ्या देवी लक्ष्मीच्या स्वयंवराची अनोखी कहाणी

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.