भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वियोग का झाला होता? जाणून घ्या देवी लक्ष्मीच्या स्वयंवराची अनोखी कहाणी

शुक्रवारच्या (Friday) सायंकाळी देवी लक्ष्मीची (Maa Lakshmi) पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की, शुक्रवारी विधीवत पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते

भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वियोग का झाला होता? जाणून घ्या देवी लक्ष्मीच्या स्वयंवराची अनोखी कहाणी
lord vishnu and lakshmi
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 1:49 PM

मुंबई : शुक्रवारच्या (Friday) सायंकाळी देवी लक्ष्मीची (Maa Lakshmi) पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की, शुक्रवारी विधीवत पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांवर पैशांचा पाऊस करते. घरात सुख-शांती आणि समृद्धी बनवून ठेवण्यासाठी भाविक शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात. अशी मान्यता आहे की देवी लक्ष्मीची पूजा केल्याने पैशांची कधीही कमतरता भासत नाही (Know The Katha Of Goddess Lakshmi And Lord Vishnu Separation As Ram And Sita Due To Curse Of Narad).

धर्मग्रंथांमध्ये लक्ष्मीला धन-समृद्धीची देवी मानलं जाते. यांना भगवान विष्णूची पत्नी आणि आदिशक्तिही म्हटलं जातं. धनची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करतात. पण, काय तुम्हाला देवी लक्ष्मी आणि प्रभू नाराणयच्या विवाहाची ही अनोखी कथा माहितीये. चला जाणून घेऊ –

पौराणिक कथेनुसार, देवी लक्ष्मीचं स्वयंवर आयोजित करण्यात आलं होतं. पण, देवी लक्ष्मीने आधीच आफल्या मनाच नारायणाला स्थान दिलं होतं. देवी लक्ष्मीने नारायणाला आपला पती म्हणून निवडलं होतं. पण, नारद मुनी देखील लक्ष्मीसोबत विवाह करण्यास इच्छूक होते. तेव्हा नारदाने विचार केला की त्यांना हरिच्या रुपात पाहून देवी लक्ष्मी त्यांचं वरण करतील.

तेव्हा नारद हे भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांनी हरिप्रमाणे सुंदर रुप मागितलं. प्रभू नारायणने त्यांची ही पूर्ण करत त्यांना हरि रुप दिलं. हरि रुपात नारद जेव्हा राजकुमारी लक्ष्मीच्या स्वयंवरात पोहोचले तेव्हा त्यांना विश्वास होता की राजकुमारी लक्ष्मी त्यांच्याच गळ्यात वरमाला घालेल, पण असं झालं नाही.

राजकुमारीने नारद यांच्या गळ्यात नाही तर नारायणाच्या गळ्यात वरमाला घातली. त्यानंतर नारदजी तेथून निराोश होऊन परतत होते, तेव्हा त्यांनी रस्त्यात एका जलाशयात स्वत:चा चेहरा पाहिला. आपला चेहरा पाहून नारद हैराण झाले, कारण त्यांचा चेहरा माकडासारखा दिसत होता (Know The Katha Of Goddess Lakshmi And Lord Vishnu Separation As Ram And Sita Due To Curse Of Narad).

हरिचे दोन अर्थ

‘हरि’ चा एक अर्थ विष्णू होतो तर एक अर्थ माकड असा होतो. भगवान विष्णूने नारदाला माकडाचं रुप दिलं. नारद यांना कळालं की भगवान विष्णूने त्यांच्यासोबत कपट केला. त्यामुळे नारद अत्यंत क्रोधित झाले. नारदांनी थेट वैकुंठ गाठलं आणि आक्रमक होऊन नारायणाला श्राप दिला की तुम्हाला मनुष्य रुपात जन्म घेऊन पृथ्वीवर जावं लागेल. ज्याप्रकारे मला स्त्री वियोग सहन करावा लागला त्याचप्रकारे तुम्हालाही पत्नी वियोग सहन करावा लागेल. त्यामुळे प्रभू राम आणि सीतेच्या रुपात जन्म घेऊन नारायण आणि देवी लक्ष्मीला वियोग सहन करावा लागला होता.

Know The Katha Of Goddess Lakshmi And Lord Vishnu Separation As Ram And Sita Due To Curse Of Narad

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

‘या’ 5 राशीच्या व्यक्तींचा पारा सर्रकन चढतो, लहान-सहान गोष्टींवरही भडकतात

Chaitra Navratri 2021 | कधीपासून सुरु होतेय ‘चैत्र नवरात्री’, जाणून घ्या कुठल्या दिवशी दुर्गा देवीच्या कुठल्या स्वरुपाची पूजा होणार….

एप्रिल महिन्यात नवरात्र, राम नवमी आणि शीतला अष्टमीसह अनेक उत्सव, जाणून घ्या कधी कुठला सण…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.