एप्रिल महिन्यात नवरात्र, राम नवमी आणि शीतला अष्टमीसह अनेक उत्सव, जाणून घ्या कधी कुठला सण…

एप्रिल महिन्यात नवरात्र, राम नवमी आणि शीतला अष्टमीसह अनेक उत्सव, जाणून घ्या कधी कुठला सण...
Puja

यावेळी 29 मार्च ते 27 एप्रिल पर्यंत चैत्र महिना असणार आहे (Upcoming April Month Festivals And Vrat List).

Nupur Chilkulwar

|

Mar 31, 2021 | 10:45 AM

मुंबई : हिंदू पंचांगातील पहिला महिना चैत्र सुरु झाला आहे. या महिन्याला चित्रा नक्षत्रामुळे हे नाव देण्यात आलं आहे. या महिन्यात वसंत आणि उन्हाळ्याला सुरुवात होते. यावेळी 29 मार्च ते 27 एप्रिल पर्यंत चैत्र महिना असणार आहे (Upcoming April Month Festivals And Vrat List).

हिंदू धर्मानुसार हा महिना पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्याच्या पंचमी तिथीला रंगपंचमीचा (Rang Panchami) सण साजरा केला जातो. 13 एप्रिलपासून नवरात्र (Navratri) सुरु होणार आहेत. तर 21 एप्रिलपासून राम नवमी साजरी केली जाईल. या महिन्याच्या पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. या खास दिवशी दान-पुण्य केल्याने लाभ मिळतो.

चला जाणून घेऊ कुठल्या दिवशी कुठला सण असेल ते –

2 एप्रिल – गुड फ्रायडे

4 एप्रिल – शीतला अष्टमी

7 एप्रिल – पापमोचिनी एकादशी

9 एप्रिल – प्रदोष व्रत

10 एप्रिल – मासिक शिवरात्री

13 एप्रिल – नवारात्र

14 एप्रिल – वैसाखी

16 एप्रिल – विनायक चतुर्थी

21 एप्रिल – राम नवमी

22 एप्रिल – चैत्र नवरात्र पारण

23 एप्रिल – कामदा एकदाशी

24 एप्रिल – शनी प्रदोष

26 एप्रिल – चैत्र पौर्णिमा

काय करावं –

या महिन्यात सूर्य देवाची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होतं. जर तुम्हाला यश आणि पद, प्रतिष्ठा हवी असेल तर भगवान सूर्याची पूजा-अर्चना करा. चैत्र महिन्यात लाल फळांचं दान करणे चांगलं असते. घरातील झाडांना नियमित पाणी घाला

चैत्र महिन्यात जेवण कमी करावं. पाणी खूप प्या. त्याशिवाय रसाळ फळांचं सेवन करा. या महिन्यात शिळ अन्न खाऊ नये. त्याशिवाय चैत्र महिन्यात गुळाचं सेवन करु नका.

Upcoming April Month Festivals And Vrat List

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Lord Hanuman | मंगळवारी ‘ही’ कामं टाळा, नाहीतर हनुमंत होतील नाराज

गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि महत्त्व…

भारतातील ‘या’ मंदिरांमध्ये पुरुषांना “नो एन्ट्री”, जाणून घ्या यामागील कारण…

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें