AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि महत्त्व…

बुधवारच्या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची (Lord Ganesha) विधीवत पूजा अर्चना करण्याचं विधान आहे (Lord Ganesha And The Story Of Durva).

गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि महत्त्व...
Lord Ganesha
| Updated on: Mar 30, 2021 | 1:07 PM
Share

मुंबई : बुधवारच्या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची (Lord Ganesha) विधीवत पूजा अर्चना करण्याचं विधान आहे (Lord Ganesha And The Story Of Durva). मान्यता आहे की गणपतीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटं समाप्त होतात. सोबतच धन-संपत्ती, बुद्धी, वि​वेक, समृद्धीतही वृद्धी होते. भगवान गणेशाच्या पूजेत दुर्वा एक विशेष प्रकारची वनस्पती चढवली जाते. त्याशिवाय गणेशाची पूजा संपन्न मानली जात नाही. गणेशजी एकमेव असे देव आहेत ज्याना पूजेत दुर्वा अर्पण केलं जातात. चला जाणून घेऊया की गणेशजींच्या पूजेत दुर्वाचं काय महत्त्व आहे आणि त्याशिवाय पूजा पूर्ण का मानली जात नाही (Lord Ganesha And The Story Of Durva Know The Importance Of Durva In Ganesha Puja).

दुर्वा समर्पित करण्यामागील पौराणिक कथा काय?

एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळात अनलासुर नावाचा एक राक्षस होता. त्यामुळे स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व लोक त्रस्त झाले होते. तो इतका भयंकर होता की ऋषी-मुनींसह सामान्य लोकांनाही जिवंत गिळायचा. या असुरामुळे त्रस्त होऊन देवराज इंद्रासह सर्व देवी-देवता आणि ऋषी-मुनीसोबत महादेवाकडे प्रार्थना करण्यासाठी पोहोचले. त्या सर्वांनी महादेवाकडे प्रार्थना केली की त्यांनी या राक्षसाचा वध करावा. तेव्हा महादेवांनी सर्व देवी-देवता आणि ऋषी-मुनींची प्रार्थना ऐकून त्यांनी सांगितलं की अनलासूराचा अंत फक्त गणपतीच करु शकतात.

कथेनुसार जेव्हा गणेशाने अनलासुराला गिळंकृत केलं तेव्हा त्यांच्या पोटात जळजळ होऊ लागली. अनेक प्रकारचे उपाय करण्यात आले. पण, गणेशजींच्या पोटातील जळजळ शांतच होत नव्हती. तेव्हा कश्यप ऋषी यांना एक युक्ती सुचली. त्यांनी दुर्वाच्या 21 गाठी बांधल्या आणि श्रीगणेशाला खायला दिल्या. जेव्हा गणेशजी यांनी दुर्वा खाल्ली तेव्हा त्यांच्या पोटातील जळजळ शांत झाली. तेव्हा भगवान श्रीगणेशाला दुर्वा अर्पित करण्याची परंपरा सुरु झाली. गणेशजींच्या पूजेत याचं मोठं महत्त्व आहे.

दुर्वामुळे पोटातील जळजळ तर कमी होतेच त्याशिवाय अनेक प्रकारच्या आजारांमध्येही यामुळे आराम मिळतो. त्यामुळे आयुर्वेदातही याला मोठं महत्त्व आहे.

Lord Ganesha And The Story Of Durva Know The Importance Of Durva In Ganesha Puja

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vinayak Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या…

Vinayak Chaturthi 2021 Upay | घरात सुख-समृद्धी हवी असेल तर विनायक चतुर्थीला ‘हे’ उपाय करा

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.