Vinayak Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या…

हिंदू धर्मात विनायक चतुर्थीचं (Vinayak Chaturthi 2021) खास महत्त्व आहे. या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा-अर्चना केली जाते.

Vinayak Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या...
Ganesh
Nupur Chilkulwar

|

Mar 17, 2021 | 8:34 AM

मुंबई : हिंदू धर्मात विनायक चतुर्थीचं (Vinayak Chaturthi 2021) खास महत्त्व आहे. या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा-अर्चना केली जाते. मान्यतेनुसार, गणेशाची पूजा केल्याने तुमचे सर्व विघ्न दूर होतात. दर महिन्यात दोन चतुर्थी येतात. शुक्ल पक्षच्या अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात (Vinayak Chaturthi 2021 Know The Puja Vidhi And Shubh Muhurt).

आज विनायक चतुर्थी आहे. यावेळी चतुर्थी बुधवारी आली आहे. बुधवारचा दिवस भगवान गणेशाला (Ganesh) समर्पित असतो. त्यामुळे याचं महत्व आणखी वाढून जातं. विनायक चतुर्थीच्या दिवशी फक्त उपवास ठेवतात. विधीवत भगवान गणेशाची पूजा करतात. गणेशाला पंचामृत, चंदन, लाल पुष्प, कुमकुम, मोदक आणि दूर्वा चढवला जातो.

शुभ मुहूर्त

विनायक चतुर्थीची तिथी 16 मार्च रात्री 08:58 पासून ते 17 मार्च सकाळी 11: 28 ला समाप्त होईल. पूजेचा शुभ मुहूर्त 17 मार्चला 11 वाजून 47 मिनिट ते दुपारी 1 वाजून 42 मिनिटांपर्यंत असेल.

महत्व काय?

हिंदू धर्मात सर्वात पहिली पूजा भगवान गणेशाची केली जाते. कुठल्याही शुभ कार्य करण्यापूर्वी पहिले गणेशजीची पूजा केली जाते. भगवान गणेशाला विघ्नहर्ता मानलं जातं. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतात (Vinayak Chaturthi 2021 Know The Puja Vidhi And Shubh Muhurt).

पूजा विधी

सकाळी सूर्योदयावेळी उठून मनाच देवाच्या नावाचं स्मरण करत उपवासाचा संकल्प करा. स्नान केल्यानंतर भगवान गणेशाला गंगा जलने स्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर मंदिरात धूप, दीप प्रज्वलित करा. रोळी किंवा शेंदूरने तिलक करा. अक्षता, पुष्प, दुर्वा, लाडू किंवा मोदक भगवान गणेशाला अर्पित करा. विनायक चतुर्थीची व्रत कथा वाचा आणि आरती करा.

Vinayak Chaturthi 2021 Know The Puja Vidhi And Shubh Muhurt

संबंधित बातम्या :

Horoscope 17th March 2021 | ‘या’ राशींच्या लोकांवर श्री गणेशाची कृपा असेल, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

घरात असेल ‘शाळीग्राम’ तर ‘हे’ नियम कटाक्षाने पाळा, अन्यथा विपरित परिणाम होऊ शकतात

शंख वाजवण्याचं महत्त्व काय? शंखाची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचे फायदे काय?, जाणून घ्या…

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें