‘या’ 5 राशीच्या व्यक्तींचा पारा सर्रकन चढतो, लहान-सहान गोष्टींवरही भडकतात

Nupur Chilkulwar

Nupur Chilkulwar |

Updated on: Apr 01, 2021 | 4:45 PM

अनेकजण अगदी लहान लहान गोष्टींवर संतप्त होतात (The Most Angry 5 Zodiac Signs). त्यांना कुठल्याही गोष्टीवर राग येऊ शकतो.

'या' 5 राशीच्या व्यक्तींचा पारा सर्रकन चढतो, लहान-सहान गोष्टींवरही भडकतात
Zodiac Signs

मुंबई : अनेकजण अगदी लहान लहान गोष्टींवर संतप्त होतात (The Most Angry 5 Zodiac Signs). त्यांना कुठल्याही गोष्टीवर राग येऊ शकतो. अनेकदा तर ते रागाच्या भरात स्वत:चंच नुकसान करतात. पण तरी हे लोक रागावर नियंत्रण करु शकत नाहीत. ज्योतिषानुसार व्यक्तीचा स्वभाव त्याची ग्रहदशा आणि त्याच्या राशीमुळे असतो. जाणून घ्या त्या राशींबद्दल ज्यांचा स्वभाव अत्यंत रागीट असतो (The Most Angry 5 Zodiac Signs They Can Argue On The Most Small Things).

मिथुन :

मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाग अत्यंत रागीट असतो. असे लहान लहान गोष्टींवरुन रागावतात. ते नेहमी दुसऱ्यांच्या उणिवा काढत असतात. पण, जर कोणीही यांना काही म्हटलं तर ते लगेच भडकतात. अनेकदा ते आक्रमकही होतात.

सिंह :

सिंह राशीच्या लोकांना कोणी त्यांना वारंवार टोकलेले अजिबात आवडत नाही. अशे लोक संपूर्ण संवतंत्रपणे काम करण्याला पसंती देतात. जर यांना कुणी कुठला आदेश दिला तर ते त्यांना मुळीच रुचत नाही. यामुळे ते अधिक आक्रमक होऊन जातात. सिंह राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे हे लोक कुणाच्याही दबावाखाली येत नाहीत.

वृश्चिक :

वृश्चिक राशीच्या लोकांच्या स्वभाव रागीट आणि नेहमी वाद करण्याचा असतो. अनेकदा वाद हेच त्यांच्या रागाचं कारण असते, कारण वादादरम्यान हे अत्यंत आक्रामक होतात. जर या राशीच्या लोकांना एकदा राग आला तर तो बराच काळ जात नाही. तुम्ही वादविवादात यांना हरवणे अत्यंत कठीण असते. अनेकदा रागाच्या भरात हे लोक असं काही बोलून जातात ज्यामुळे यांच्या जवळच्या व्यक्तीला वाईट वाटेल.

मकर :

या राशीच्या लोकांचा स्वभाव अत्यंत चिडचिडा असतो. ते कधी कुठल्या गोष्टीवरुन इरिटेट होतील याबाबत काहीही सांगता येत नाही. हे लोक नेहमी टोमणे मारत असतात. जर समोरच्या व्यक्तीने यांना काही म्हटलं तर ते वाद घालतात.

कुंभ :

कुंभ राशीच्या लोकांना खूप राग येतो, पण ते रागाला मनातच ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण, जेव्हा यांना राग येतो तेव्हा ते स्वत:वरील नियंत्रण हरवून बसतात. यांना खूप राग येतो. हे अत्यंत मुडी असतात. या लोकांना काय आवडेल आणि काय नाही हे कुणीही सांगू शकत नाही. यांना जेवढ्या लवकर राग येतो तेवढ्याच लवकर यांचा राग शांतही होतो.

The Most Angry 5 Zodiac Signs They Can Argue On The Most Small Things

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | जर ध्येय गाठायचं असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे सल्ले नेहमी लक्षात ठेवा…

Genius Zodiac Sign | ‘या’ चार राशींना सर्वात तेजस्वी मानलं जातं, यामध्ये तुमची राशी आहे का? जाणून घ्या

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI