‘या’ 5 राशींंच्या लोकांकडे ‘लक्ष्मी’ असते, धनाची कधी कमी नसते…!

ज्योतिष शास्त्रात राशीला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे (Five Zodiac Signs Are Very Lucky). याच्या माध्यमातूनअनेक ज्योतिषाचार्य व्यक्तीच्या वर्तमान जीवन आणि त्यांच्या भविष्याचा अंदाज लावतात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:44 PM, 24 Mar 2021
'या' 5 राशींंच्या लोकांकडे 'लक्ष्मी' असते, धनाची कधी कमी नसते...!
Horoscope

मुंबई : ज्योतिष शास्त्रात राशीला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे (Five Zodiac Signs Are Very Lucky). याच्या माध्यमातूनअनेक ज्योतिषाचार्य व्यक्तीच्या वर्तमान जीवन आणि त्यांच्या भविष्याचा अंदाज लावतात. यानुसार, 5 राशींना आर्थिक प्रकरणात अत्यंत भाग्यवान मानलं जातं. या राशीच्या लोकांच्या कुंडलीत स्वामी जर शुभ स्थितीत असेल तर त्यांच्याकडे कधीही आर्थिक समस्या उद्भवत नाही (These Five Zodiac Signs Are Very Lucky In Terms Of Wealth).

सिंह –

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. सूर्य जर कुंडलीत उच्च अवस्थेत म्हणजेच शुभ स्थानी विराजमान असतील तर व्यक्तीला संपत्ती, अपार यश आणि कीर्ती लाभते. असे लोक दिवसेंदिवस प्रगती करतात

कुंभ –

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. शनिदेव कुणालाही राजा आणि रंक बनवू शकतात. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनिदेव उच्च स्थितीत असेल किंवा ते शुभ स्थानी विराजमान असतील तर अशा लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहाते आणि त्यांच्याकडे संपत्तीची काही कमी भासत नाही.

वृषभ –

वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र जर कुंडलीत मजबूत स्थितीत असेल तर ते लोक विलासी आयुष्य जगतात. त्यांच्याकडे संपत्ती, वैभवची काहीही कमी राहात नाही. असे लोक नोकरी आणि व्यापारात खूप प्रगती करतात.

धनु –

या राशीचा स्वामी गुरु बृहस्पती असतो. गुरु बृहस्पती जर उच्च स्थितीत असेल किंवा शुभ स्थानी विराजमान असेल तर ते व्यक्ती जीवनात खूप प्रगती करतात. त्यांच्याकडे अफाट संपत्ती असते आणि त्यांना समाजात खूप मान-सन्मान प्राप्त होतो.

मिथुन –

या राशीचा स्वामी बुध आहे. बुध जर शुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीचा भाग्योदय होतो. अशात लोकांना उत्पन्नाचे अनेक मार्ग मोकळे होतात. त्यांच्याजवळ पैशांची कमी होत नाही. खर्च वाढले तरी त्यांच्याकडे इतकी संपत्ती असते की त्यांना खर्च वाढल्याने काहीही फरक पडत नाही (These Five Zodiac Signs Are Very Lucky In Terms Of Wealth).

These Five Zodiac Signs Are Very Lucky In Terms Of Wealth

संबंधित बातम्या :

Horoscope 24th March 2021 | ‘या’ राशींवर राहील भगवान गणेशाची कृपा, जाणून घ्या तुमचा दिवस कसा असेल?

Horoscope 23rd March 2021 : आज हनुमानजी कोणावर प्रसन्न होणार? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य…