AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryadev Puja Benefits: आयुष्यात प्रगती थांबली आहे?; मग दर रविवारी अशा प्रकारे करा सूर्य देवाची पूजा

संपूर्ण विश्वाला प्रकाश देणारे सूर्य देव हे केवळ संपूर्ण जगाचे  उद्धारकर्ता (Progress in life has stopped) नसून ते नवग्रहांचे स्वामी मानले जातात. सूर्यदेव असा देव आहे ज्याच्या दर्शनाशिवाय कोणाचाही दिवस सुरू होत नाही. रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. भगवान सूर्याचा दिवस असल्याने रविवारी भगवान सूर्याची पूजा करणे पुण्यकारक मानले जाते (Suryadev Puja Benefits). सूर्यदेवाला […]

Suryadev Puja Benefits: आयुष्यात प्रगती थांबली आहे?; मग दर रविवारी अशा प्रकारे करा सूर्य देवाची पूजा
| Updated on: Jun 12, 2022 | 10:34 AM
Share

संपूर्ण विश्वाला प्रकाश देणारे सूर्य देव हे केवळ संपूर्ण जगाचे  उद्धारकर्ता (Progress in life has stopped) नसून ते नवग्रहांचे स्वामी मानले जातात. सूर्यदेव असा देव आहे ज्याच्या दर्शनाशिवाय कोणाचाही दिवस सुरू होत नाही. रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. भगवान सूर्याचा दिवस असल्याने रविवारी भगवान सूर्याची पूजा करणे पुण्यकारक मानले जाते (Suryadev Puja Benefits). सूर्यदेवाला हिरण्यगर्भ असेही म्हणतात. हिरण्यगर्भ म्हणजे ज्याच्या पोटात सोनेरी आभा आहे. त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी रविवारी सूर्यदेवाची विधिवत पूजा करून जल अर्पण करावे. असे केल्याने आपल्या कुटुंबावर सूर्याची कृपा राहते. उगवत्या सूर्याला नमस्कार केल्याने प्रगती होते. सकाळी लवकर आंघोळ करून उगवत्या सूर्याचे दर्शन घ्यावे. यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते. जाणून घेऊया रविवारच्या दिवशी साऱ्याची पूजा करण्याचे फायदे.

  1. कुंडलीत सूर्याचे स्थान बलवान असेल तर मान-प्रतिष्ठा मिळते. राजकीय क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात आणि नोकरीमध्ये प्रगतीकरण्यासाठी सूर्याची कृपा खूप महत्त्वाची आहे. सूर्य स्वत: राजा आहे, म्हणून राजकारण किंवा राज्य कारभाराशी संबंधित व्यवसायाशी संबंधितांनी रविवारी सूर्याची पूजा करावी.
  2. रविवारी सूर्यदेवाचे पूजन केल्याने मान-सन्मान मिळतो. भाग्योदय होतो, ज्यामुळे नोकरीशी आणि व्यवसायाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. सूर्यदेव त्यांच्यावर प्रसन्न राहिल्याने सर्व अशुभ परिणामांचे रूपांतर शुभ परिणामात होते. रविवारी सूर्याला जल अर्पण केल्याने बुद्धी, ज्ञान, वैभव, तेज आणि सामर्थ्य वाढते.
  3. रविवारी तेल आणि मीठाचे सेवन करू नये. रविवारी आहारात मांस आणि मद्य व्यर्ज करावे. रविवारी तेल मसाज करू नये. या दिवशी चुकूनही तांब्याच्या धातूची खरेदी-विक्री करू नका.
  4. सनातन धर्मात सूर्याला जल अर्पण करण्याची परंपरा आहे. वैदिक काळापासून चालत आलेली ही परंपरा आजही पाळली जाते. भगवान राम रोज सूर्याची पूजा करत असत. दररोज सूर्याला जल अर्पण करावे, असेही शास्त्रात सांगितले आहे, परंतु दररोज करणे शक्य नसल्यास किमान रविवारी न चुकता सूर्याला जल अर्पण करावे. यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते.
  5.  सूर्याला जल अर्पण करण्याबाबत काही नियम सांगण्यात आलेले आहे.  सूर्याला स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे. सूर्यदेवाला  सूर्योदयानंतर एक तासाच्या आत अर्घ्य द्यावे. सकाळी ८ वाजेपर्यंत सूर्याला अर्घ्य दिल्यास विशेष लाभ मिळतो. सूर्याला पाणी देण्यापूर्वी त्या पाण्यात चिमूटभर रोळी किंवा लाल चंदन टाकून अर्पण करावे .

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.