देवाचं दर्शन घेऊन मंदिरातून घरी परतताना या चुका करू नका; अन्यथा पूजा होईल व्यर्थ
मंदिरात आपण जेव्हा जातो तेव्हा मनोभावे आपण भगवंताची पूजा करतो, प्रार्थना करतो. पण बऱ्याच जणांना हे माहित नसेल की, जसे मंदिरात पूजा करण्याचे काही नियम असतात तसेच नियम मंदिरातून परततानाचे देखील नियम असतात. जे पाळणेही आवश्यक आहे.

आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा मनोभावे देवाची पूजा करतो, प्रार्थना करतो म्हणजे जे काही नियम आहेत ते सर्व पाळतो. कारण हिंदू धर्मात पूजेचे विशेष महत्त्व आहे.पण तुम्ही असा कधी विचार केला आहे का? मंदिरात पूजा करण्यासाठी जसे काही नियम असतात तसेच काही नियम हे मंदिरातून घरी परतताना देखील असतात. होय, वास्तुशास्त्रात मंदिरातून परत येतानाही काही नियम आहेत जे पाळणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की या नियमांचे पालन केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते. वास्तुनुसार मंदिरातून परत येताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊयात.
घरी आल्यानंतर प्रसाद ग्रहण करावा
वास्तुशास्त्रानुसार, मंदिरात मिळालेला प्रसाद घरी आल्यानंतर सेवन करावा. वाटेत प्रसाद खाऊ नये. संपूर्ण कुटुंबासह प्रसाद सेवन करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे अर्थातच देवाचा आशीर्वाद सर्वांनाच लाभतो.
रिकामा पेला किंवा तांब्या घरी आणू नये
वास्तुशास्त्रानुसार, मंदिरात जाताना किंवा येताना तुम्ही घेऊन गेलेला एखादा पाण्याचा पेला किंवा तांब्या कधीही रिकामा परत आणू नये. देवाला पाणी अर्पण केल्यानंतर, लोट्यात थोडे पाणी शिल्लक ठेवावे आणि ते घरी परत आणावे. मंदिरातून परत आल्यानंतर, हे पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. असे मानले जाते की असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. कारणे ते मंदिरा सारख्या पवित्र स्थळावरून आणलेले असते.
पाय धुवू नये
वास्तुशास्त्रानुसार, मंदिरातून घरी आल्यानंतर लगेच पाय धुवू नयेत. असे केल्याने मंदिरातून येताना आपल्या सोबत असलेली सकारात्मक ऊर्जा कमी होते.
इतर कुठेही जाऊ नये
वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही मंदिरात जाताना कुठेही दुसऱ्या खरेदीसाठी वैगरे किंवा कोणी रस्त्यात भेटले तर बोलत थांबू नये थेट मंदिरात जावे. आणि मंदिरातून परत येताना देखील दुसरीकडे कुठेही न जाका थेट घरी किंवा कामाच्या ठिकाणी जावे. त्यामुळे मंदिरातील भगवंताच्या कृपेचं, सकारात्मक ऊर्जेचं जे वलय निर्माण झालेलं असतं ते तसच राहतं.
परत येताना घंटी वाजवू नका
वास्तुशास्त्रानुसार, दर्शनानंतर मंदिरातून परतताना घंटा वाजवू नये. असे केल्याने मंदिरातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच शक्य असल्यास भगवंताचा नामजप करत घरी परतने सगळ्यात शुभ मानले जाते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
