AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बागेश्वर धाम येथे तयार होणार देशातील पहिले हिंदू गाव, धीरेंद्र कृष्ण शास्री यांचा घोषणा

बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हिंदू एकता यात्रेनंतर देशातील पहिल्या हिंदू गावाचा पाया रचला आहे. हे गाव पुढील दोन वर्षांत तयार होईल.

बागेश्वर धाम येथे तयार होणार देशातील पहिले हिंदू गाव, धीरेंद्र कृष्ण शास्री यांचा घोषणा
Dhirendra Krishna Shastri
| Updated on: Apr 04, 2025 | 10:11 PM
Share

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्री यांनी हिंदू एकता यात्रेनंतर आता देशातील पहिल्या हिंदू गावाची मुहूर्तमेढ रोवली आहे. हे गाव येत्या दोन वर्षांत बांधून तयार होणार आहे, धीरेंद्र शास्री यांनी विधीवत वैदिक मंत्रोच्चारात भूमीपूजन करीत या गावाच्या निर्मितीचा शुभारंभ केला आहे. मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम ( गढा ) येथे बांधल्या जाणाऱ्या या हिंदू गावात सुमारे १,००० कुटुंबे स्थायिक होणार आहेत.

बागेश्वर धाम जनसेवा समिती सनातन धर्मप्रेमींना जमीन देणार आहे. ज्यावर इमारती बांधल्या जातील. पहिल्याच दिवशी, दोन कुटुंबांनी येथे स्थायिक होण्यास सहमती दर्शविली आणि कागदपत्रे पूर्ण केली. याशिवाय, या हिंदू गावात घरे बांधण्यासाठी सुमारे ५० लोक पुढे आले आहेत.  धीरेंद्र शास्त्री यांनी वैदिक मंत्रांच्या योग्य जपाने भूमिपूजन करून या गावाची पायाभरणी केली.

एक गाव नाही तर हिंदू राष्ट्राचा पाया आहे

याप्रसंगी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री कन्यापूजनही केले.  हिंदू राष्ट्राचे स्वप्न हिंदू घरापासून सुरू होते असेही ते यावेळी म्हणाले. जेव्हा हिंदू कुटुंबे, हिंदू समाज आणि हिंदू गावे निर्माण होतील तेव्हाच हिंदू तहसील, हिंदू जिल्हा आणि हिंदू राज्याचे स्वप्न साकार होईल. ते म्हणाले की, हे फक्त एक गाव नाही तर हिंदू राष्ट्राचा पाया आहे. हे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे असेही बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.