AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या लोकांनी चुकूनही घालू नका चांदीचे दागिने, अन्यथा आयुष्यभर सहन करावा लागेल त्रास

बरेच लोक चांदीच्या अंगठ्या किंवा इतर दागिने घालतात. खरे तर ज्योतिष शास्त्रात चांदीचे दागिने घालणे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते. चांदीचा सबंध थेट चंद्राशी आहे. चांदीचे दागिने घातल्याने चंद्राशी संबंधित समस्या कमी होतात. परंतु ज्योतिष शास्त्रात काही लोकांना चांदीचे दागिने घालण्यास मनाई करण्यात आली आहे . त्यामुळे कोणकोणत्या लोकांनी चांदीचे दागिने घालणे टाळावे ते जाणून घेऊ.

या लोकांनी चुकूनही घालू नका चांदीचे दागिने, अन्यथा आयुष्यभर सहन करावा लागेल त्रास
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 3:52 PM
Share

आज काल प्रत्येक जण अंगावर काही ना काही चांदीचे दागिने घालतो. चांदीच्या दागिन्याचे ज्योतिष शास्त्रात खूप महत्व आहे. चांदीच्या दागिने अंगावर घालणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की चांदीचे दागिने घातल्याने मन आणि मेंदू मजबूत होतो. तसेच कुंडलीतील येथील चंद्र मजबूत होतो.

चांदी धारण केल्याने बिघडते ग्रह आणि ताऱ्यांची स्थिती चांदीचे दागिने घातल्याने जसे फायदे होतात तसेच त्यामुळे काही तोटे देखील होतात. ज्योतिष शास्त्रानुसार चांदीचे दागिने धारण केल्याने काही ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थिती बिघडतात. त्यामुळे चांदीचे दागिने घातल्याने फायदे न होता नुकसान होऊ लागते. त्यामुळे काही लोकांनी चांदीचे दागिने घालणे टाळले पाहिजे. जाणून घेऊया कोणत्या लोकांनी चांदीचे दागिने घालू नयेत.

या लोकांनी घालू नये चांदीचे दागिने

1. ज्योतिष शास्त्रानुसार जे लोक खूप भावनिक असतात किंवा खूप रागवतात अशा लोकांनी चांदीचे दागिने घालू नये. या लोकांनी चांदीचे दागिने घातली तर त्यांच्या भावना आणि राग दोन्ही वाढू लागतात. 2. चंद्राला लक्षात ठेवून चांदीचे दागिने अंगावर घातले जातात. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र 12 व्या किंवा 10 व्या घरात आहे त्यांनी चांदीच्या दागिने घालणे टाळावे. 3. वृषभ, मिथुन, कन्या, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना ही ज्योतिष शास्त्रानुसार चांदीचे दागिने घालण्यास मनाई आहे. 4. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शुक्र, बुध आणि शनीचे वर्चस्व आहे त्यांनीही चांदीचे दागिने घालणे टाळावे. 5. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राचे वर्चस्व कमी असेल किंवा ज्यांचे मन नेहमी विचारात असते त्यांनी चांदीचे दागिने घालू नये. तसेच शांत स्वभावाच्या लोकांनी चांदीचे दागिने अजिबातच घालू नये. 6. ज्योतिषशास्त्रात देखील मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांना चांदीचे दागिने घालण्यास मनाई आहे. 7. चांदीचे दागिने घालण्यापूर्वी कुंडलीतील चंद्र आणि इतर ग्रहांची स्थिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी