AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे’ फुल झाड लक्ष्मी मातेचं आहे प्रतिक, घरात लावल्याबरोबरच वाढते आर्थिक समृद्धी आणि सकारात्मकता

घर हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. लोकं आपले घर सुंदर बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. केवळ घराचे सौंदर्य वाढवण्यासाठीच नव्हे, तर घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठीही विविध प्रकारची झाडं व रोपं घरात लावली जातात.

'हे' फुल झाड लक्ष्मी मातेचं आहे प्रतिक, घरात लावल्याबरोबरच वाढते आर्थिक समृद्धी आणि सकारात्मकता
vastu shastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Jul 20, 2026 | 10:41 AM
Share

घर हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. लोकं आपले घर सुंदर बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. केवळ घराचे सौंदर्य वाढवण्यासाठीच नव्हे, तर घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठीही विविध प्रकारची झाडं व रोपं घरात लावली जातात. वास्तुशास्त्रामध्ये तुळस, अपराजिता, अशोक इत्यादी अनेक शुभ झाडं आणि वनस्पतींचे सविस्तर माहिती सांगितली आहे. तर यामध्ये कण्हेर हे फुल झाडं सुद्धा या शुभ झाडांपैकी एक आहे. हे फुल झाडं अत्यंत प्रभावी मानली जाते. घरात हे फुल झाडं लावल्याने आर्थिक समृद्धी आणि सकारात्मकता वाढते. चला तर मग वास्तूनुसार या कण्हेर फूल झाडांच इतर महत्त्व जाणून घेऊयात.

पौराणिक कथेनुसार, कण्हेर वनस्पती ही धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी मातेचं प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की ज्या घरात ही शुभ वनस्पती योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला लावली जाते, ते घर नेहमीच धन आणि समृद्धीने समृद्ध होते. धर्मग्रंथांमध्ये या वनस्पतीच्या विविध रंगांना विशेष महत्त्व असल्याचे वर्णन केले आहे.

पांढऱ्या आणि पिवळ्या रंगांच्या कण्हेर फुलाचे महत्त्व

पांढरा कण्हेरचं फूल लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय मानला जाते. या रंगाचा कण्हेर लावल्याने घरात लक्ष्मी मातेचा सतत वावर सुनिश्चित होतो. आर्थिक अडचणी दूर होतात. तर यातील पिवळा कण्हेर फूल हे भगवान विष्णूला समर्पित आहे. घरात पिवळ्या कण्हेराचे रोप लावल्याने शांती आणि आनंद टिकून राहतो. शिवाय, पिवळा कण्हेर घरातील वास्तुदोष देखील दूर करतो.

वास्तुशास्त्रज्ञांच्या मते, कण्हेरचे झाड घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. योग्य दिशेला हे झाड लावल्याने प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये सलोखा टिकून राहतो.

कण्हेरचं रोप लावताना या गोष्टी लक्षात ठेवा

वास्तुशास्त्रानुसार कण्हेर लावण्यासाठी वायव्य किंवा पश्चिम दिशा आदर्श आहे. ईशान्य किंवा नैऋत्य दिशा या रोपासाठी योग्य नाहीत. कण्हेर विषारी असू शकते, त्यामुळे ते घरामध्ये न लावता मोकळ्या जागेत किंवा बागेत लावावे. पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची कण्हेर घरासाठी शुभ मानली जातात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...