Thursday Astro Tips | चिमुटभर हळदीने दूर होतील सर्व समस्या, गुरुवारी हे उपाय नक्की करा

आयुर्वेदात हळद ही एक औषधी वनस्पती मानली जाते. हळदीचे सेवन केल्याने सर्व आजारांपासून बचाव होतो. त्याचबरोबर हळदीला धार्मिक कार्यातही विशेष स्थान आहे. पूजेच्या वेळीही हळदीचा तुकडा वापरला जातो. लग्नाच्या वेळीही वधू-वराला हळद लावली जाते, जेणेकरुन ते सर्व अडथळ्यांपासून वाचतील

Thursday Astro Tips | चिमुटभर हळदीने दूर होतील सर्व समस्या, गुरुवारी हे उपाय नक्की करा
Thursday Astro Tips
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Jul 29, 2021 | 11:20 AM

मुंबई : आयुर्वेदात हळद ही एक औषधी वनस्पती मानली जाते. हळदीचे सेवन केल्याने सर्व आजारांपासून बचाव होतो. त्याचबरोबर हळदीला धार्मिक कार्यातही विशेष स्थान आहे. पूजेच्या वेळीही हळदीचा तुकडा वापरला जातो. लग्नाच्या वेळीही वधू-वराला हळद लावली जाते, जेणेकरुन ते सर्व अडथळ्यांपासून वाचतील (Thursday Astro Tips These Turmeric Upay Can Solve Your Many Problems In Life).

पण ज्योतिषात हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी आहे. बृहस्पति यांना देवगुरु मानले जाते. एखाद्याच्या कुंडलीत जर बृहस्पति मजबूत स्थितीत असेल त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या स्वतःच निघून जातात. हळदीचे असे काही उपाय येथे जाणून घ्या जे आपल्या राशीतील बृहस्पति ग्रहाला बळकट बनविण्यासाठी उपयुक्त ठरतील.

1. गुरुवारी दोन चिमूटभर हळद पाण्यात मिसळून त्याने आंघोळ केली तर गुरुची स्थिती बळकट होते आणि लग्नातील सर्व अडथळे दूर होतात, तसेच करिअरमध्येही यश मिळते.

2. पूजेच्या वेळी मनगटावर किंवा गळ्यावर हळदीचा छोटासा टिळा लावल्याने बृहस्पति मजबूत होतो आणि बोलण्यात कौशल्य येते.

3. गुरुवारी हळद दान केल्यास आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

4. जर तुमच्या घरात वास्तू दोष असेल तर दर गुरुवारी आपल्या खोल्यांच्या कोपऱ्यात हळद शिंपडा. यामुळे वास्तुदोष दूर होतात.

5. जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी घर सोडत असाल तर गणपतीला हळद लावल्यानंतर स्वत:च्या कपाळावर लावा. हे आपल्या कामात येणारे अडथळे दूर होतात.

6. जर घराच्या सीमेवरील भिंतीवर हळदीची रेषा बनविली तर घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करु शकत नाहीत.

7. जर गुरु दुर्बळ असेल तर हळदीच्या माळेने गुरु बृहस्पतीचे मंत्र किंवा नारायण मंत्राचा जप करावा. याने एखाद्या व्यक्तीला विलक्षण बुद्धिमत्ता प्राप्त होते.

8. नशिबाने साथ दिली नाही तर दर गुरुवारी बृहस्पतिला हळद लावा आणि “ओम ऐं क्लीं बृहस्पतिये नम: मंत्र” या मंत्राचा जप करा. याने सौभाग्य जागृत होते

Thursday Astro Tips These Turmeric Upay Can Solve Your Many Problems In Life

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips | घरात हिरव्या रंगाचा वापर करा, सौभाग्य, विकास आणि आरोग्य लाभेल

Best Vastu Tips : आनंदी जीवनासाठी खूपच मौल्यवान असतात हे वास्तू नियम, जाणून घ्या याविषयी सर्वकाही

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें