एका लग्नाच्या दोन अजब गोष्टी, सकाळी सागर-प्रियंकाचं लग्न, तर सायंकाळी राम-सीतेचं! अनोखा विवाहसोहळा

एका लग्नाच्या दोन अजब गोष्टी, सकाळी सागर-प्रियंकाचं लग्न, तर सायंकाळी राम-सीतेचं! अनोखा विवाहसोहळा
सकाळी सागर-प्रियंकाचं लग्न, तर सायंकाळी राम-सीतेचं! नगरच्या जळगावातला अनोखा विवाहसोहळा

सकाळी सागर-प्रियंकाचं लग्न, तर सायंकाळी राम-सीतेचं! नगरच्या जळगावातला अनोखा विवाहसोहळा

मनोज गाडेकर

| Edited By: सिद्धेश सावंत

May 25, 2022 | 6:27 PM

सागर आणि प्रियकांच्या अजब लग्नाची गजब गोष्ट

एकाच दिवसात दोनदा विवाह करण्याचा मान राहाता तालुक्यातील जळगाव येथील सागर वैराळ आणि वधू प्रियंका यांना मिळालाय….ठरल्या मुहूर्तावर अग्नीच्या साक्षीने सागर वैराळ आणि कोपरगाव तालुक्यातील प्रियंका घारू यांचा विवाह पार पडला. तर दुसरा विवाह त्याच दिवशी सायंकाळी रामकथा सोहळ्यात शेकडो श्रोत्यांच्या उपस्थितीत थाटात पार पडला. सागर वैराळ याच्या गावी विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. सप्ताहात सागरच्या लग्नाच्या दिवशी प्रभू राम आणि सितेचा विवाह पार पडणार होता. या सोहळ्यात नव दाम्पत्यांनी सिता स्वयंवरात सहभाग घ्यावा आणि राम आणि सितेचे पात्र साकारावे अशी इच्छा ग्रामंस्थांनी व्यक्त केली. हा प्रस्ताव ऐकताच वर पित्याने अगदी आनंदाने त्यास होकार दर्शवला. वधुवरांसह नातेवाईकांसह वधू – वर कथा सोहळ्याच्या ठिकाणी पोहचले आणि राम – सितेच्या वेशभुषेत पुन्हा सागर आणि प्रियंकाचा विवाह थाटामाटात पार पडला. अजब लग्नाची गजब गोष्ट आता जिल्हयात चर्चेचा विषय ठरतेय.

भाग्य असे लाभले ; एकाच दिवशी दोनदा विवाहाचा मिळाला मान !!

अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातील जळगाव येथील सागर वैराळ कोपरगाव तालुक्यातील प्रियंका घारू यांचा विवाह दुपारच्या मुहूर्तावर कोपरगाव येथे नुकताच पार पडला. विवाहाचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर वधुवरांसह वर्‍हाडी मंडळी सायंकाळच्या सुमारास जळगाव येथे पोहचले. वराकडून वरातीची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी जळगावात रामकथेचा कार्यक्रम सुरू होता.त्यामुळे दुस-या विवाहाचा योगयोग सर्वांच्या सहमतीने जुळून आला.

हे सुद्धा वाचा

राम सीत होण्याचा मिळाला मान

रामायणातील पात्राप्रमाणे वर सागर व वधु प्रियंका यांना राम सितेप्रमाणे मुकूट परिधान करण्यात आला. सुमधूर आवाजात मंगलअष्टके म्हणून हा विवाह पुन्हा एकदा पार पडला. हा विवाह पाहण्यासाठी संपूर्ण गाव उपस्थित होते. अशा पध्दतीने एकाच दिवशी दोनदा विवाह करण्याचे भाग्य सागर आणि प्रियंका या वधुवरांना मिळाले. लग्नाच्या दिवशी राम सीता होण्याचा मान मिळाल्याने ग्रामस्थ तर खुश होतेच त्याच बरोबर नव दांम्पत्य ही खुश होतं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें