‘मातोश्री’ची पत घसरली? उद्धव ठाकरे यांना अखेर राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, पण…

मला राम मंदिर सोहळ्याची आवश्यकता नाही, मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणाची गरज नसते. पण मी त्या दिवशी अयोध्येला जाणार नाही. मी यापूर्वी अयोध्येला अनेकदा जाऊन आलो आहे. त्या दिवशी मी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहे. हे मंदिर ऐतिहासिक आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. असं असलं तरी उद्धव ठाकरे यांनाही अयोध्येच्या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

'मातोश्री'ची पत घसरली? उद्धव ठाकरे यांना अखेर राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, पण...
Uddhav Thackeray Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 2:34 PM

मुंबई | 21 जानेवारी 2023 : अयोध्येत उद्या राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. देशविदेशातील भाविकही या सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. देशातील हा सर्वोच्च सोहळा असणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील नेत्यांना आणि व्हीआयपींना निमंत्रण देण्यात आलं आहे. अनेकांना स्वत: भेटून निमंत्रण देण्यात आलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. पण उद्धव ठाकरे हे या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.

रामजन्मभूमी ट्रस्टने निवडणूक आयोगाकडून यादी घेऊन देशातील नोंदणीकृत पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना निमंत्रणे आली आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. पण उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष मातोश्रीवर जाऊन निमंत्रण देण्यात आलेलं नाही. उद्धव ठाकरे यांना स्पीड पोस्टने निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरारा कमी होतोय?

एकेकाळी मातोश्रीचा दरारा होता. भाजपचे बडे नेते मातोश्रीतच येऊन चर्चा करायचे. मातोश्रीतूनच सर्व राजकीय निर्णय व्हायचे. कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर मातोश्रीकडे भाजपचे नेते यायचे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडताच मातोश्रीचा दरारा कमी होताना दिसतोय. आधी शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ताकद कमी झाली. आता तर उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील सोहळ्याचं स्पीड पोस्टने निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे ठाकरेंचा दरारा कमी झालाय का? अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, बाबरी पडली तेव्हा त्याची जबाबदारी घेणारं विधान बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. बाळासाहेबांनी नेहमीच अयोध्येतील राम मंदिराचं समर्थ केलं होतं, असं असतानाही उद्धव ठाकरे यांना स्पीड पोस्टने या सोहळ्याचं निमंत्रण दिलं गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राऊतांचा संताप

उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने निमंत्रण देण्यात आलं आहे, त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ज्यांचा राम जन्मभूमीशी काहीच संबंध नाही, अशा प्रसिद्ध लोकांना आणि बॉलिवूड सेलिब्रिटिंना तुम्ही विशेष निमंत्रण देत आहात. आणि राम मंदिराच्या आंदोलनात ज्या ठाकरे कुटुंबाने मोठं योगदान दिलं, त्या ठाकरे कुटुंबासोबत तुम्ही अशा पद्धतीने वागत आहात? तुमच्या या वागण्याला भगवान रामही कधीच माफ करणार नाही. भगवान राम तुम्हाला शाप देतील. तुम्ही भगवान रामाची प्रार्थना करता आणि रावणासारखं सरकार चालवता? असा सवाल संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.