AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishakh Month | वैशाख महिन्यात हे उपाय करा, प्रत्येक संकट होईल दूर

वैशाख महिना आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून सुरु झाला आहे (Vaishakh Month 2021) आणि 26 मे 2021 पर्यंत असेल. या महिन्याला वैशाख म्हणतात कारण हा विशाखा नक्षत्राशी संबंधित आहे.

Vaishakh Month | वैशाख महिन्यात हे उपाय करा, प्रत्येक संकट होईल दूर
Vishnu And mahadev
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Apr 28, 2021 | 12:25 PM
Share

मुंबई : वैशाख महिना आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून सुरु झाला आहे (Vaishakh Month 2021) आणि 26 मे 2021 पर्यंत असेल. या महिन्याला वैशाख म्हणतात कारण हा विशाखा नक्षत्राशी संबंधित आहे. पूजा आणि इतर धार्मिक कार्यात वैशाख महिना खूप महत्वाचा मानला जातो. या महिन्यात दान, याशिवाय गंगा स्नान करुन भगवान विष्णू आणि महादेवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे केल्याने त्रिदेवचा आशीर्वाद प्राप्त होतो (Vaishakh Month 2021 Do These Upay To Get Rid Of All Problems In Life).

वर्षातून एकदा वैशाख महिन्यात भाविकांना बांकेबिहारीचे दर्शनही दिले जाते. तुमच्या आयुष्यात सर्व संकट चालू असल्यास, वैशाख महिन्यात भगवान विष्णू आणि शिव यांची पूर्ण भक्ती आणि श्रद्धापूर्वक पूजा करा. यामुळे सर्वात मोठ्या संकटांवरही मात करता येते.

अशाप्रकारे उपासना केल्यास संकट दूर होतील

या संपूर्ण महिन्यात सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान करावे. यानंतर प्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यानंतर भगवान विष्णूला तुळशीचे पान अर्पण करा आणि चंदन, पाणी, फुले, पिवळ्या अक्षता इत्यादी अर्पण करा. यानंतर नारायणाच्या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्त्रनाम किंवा गीतेचं पठन करा. गीतेमध्ये, भगवान श्रीकृष्णाने पिंपळाला स्वतःचे रुप असल्याचे वर्णन केले आहे. शिव मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास या संपूर्ण महिन्यात आपल्या क्षमतेनुसार दान करावे किंवा गरजूंना अन्न द्या.

शिवलिंगाला पाणी अर्पण करा

या संपूर्ण महिन्यात तुम्ही मंदिरात जाऊन शिवलिंग आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. जर तुमची इच्छा असेल तर मंदिरात शिवलिंगावर पाण्याने भरलेला कलश स्थापित करा. मान्यता आहे की कलशातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत समस्यांचाही अंत होतो.

पारद शिवलिंगाला पंचामृताने स्नान करा

जर आपल्या घरात पारद शिवलिंग असेल तर आपण शिवलिंगावर महिनाभर दररोज दूध, दही, मध, तूप आणि पाण्याने अभिषेक करावा. यानंतर शिवलिंगाला चंदन लावा आणि दीप प्रज्वलित करा आणि रुद्राक्षच्या जपमाळेसह 108 वेळा शिव मंत्राचा जप करावा. असे केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.

रोगापासून मुक्त होण्यासाठी

कोरोना काळात घरोघरी लोक त्रस्त आहेत. या रोगाने अनेक कुटुंबांना वेढा घातला आहे. तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्येमुळे किंवा इतर कुठल्याही आजारामुळे त्रास होत असेल तर वैशाख महिन्यात दुधामध्ये काळे तिळ घाला आणि शिवलिंगावर अर्पित करा. याचा चमत्कारी परिणाम समोर येतो.

Vaishakh Month 2021 Do These Upay To Get Rid Of All Problems In Life

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Hanuman Jayanti 2021 | विवाहित आणि पिताही होते ब्रह्मचारी हनुमान, जाणून घ्या त्यांच्या पत्नी आणि पुत्राची कहाणी

‘रामायणा’त रावणाच्या पायाखाली निळ्या रंगाचा ‘तो’ व्यक्ती नेमका कोण? जाणून घ्या उत्तर…

जेव्हा भगवान नरसिंहाला शांत करण्यासाठी महादेवाने घेतला सर्वेश्वर अवतार, जाणून घ्या नेमकं काय घडले?

Kamada Ekadashi 2021 | कामदा एकादशी तिथी, वेळ, महत्त्व आणि कथा, जाणून घ्या…

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत