AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैष्णो देवी मंदिरात पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांना किती पगार मिळतो? आकडा ऐकून विश्वास बसणार नाही!

त्रिकुटा पर्वतावर वसलेले वैष्णो देवी मंदिर हे देशातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या मंदिरात भक्तांच्या पूजेची आणि विधींची जबाबदारी सांभाळणाऱ्या पुजाऱ्यांचे मानधन देखील ठराविक आणि नियमानुसार दिला जातो.

वैष्णो देवी मंदिरात पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांना किती पगार मिळतो? आकडा ऐकून विश्वास बसणार नाही!
mata vaishno devi temple
| Edited By: | Updated on: Apr 15, 2025 | 2:23 PM
Share

भारतभरातील श्रद्धाळूंना आपल्याकडे आकर्षित करणाऱ्या त्रिकुटा पर्वतावर वसलेल्या ‘वैष्णो देवी’ मंदिराला धार्मिक जगतात विशेष मान आहे. दरवर्षी करोडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. ‘जय माता दी’च्या जयघोषात मंदिर परिसर नेहमीच भक्तांच्या गर्दीने फुललेला असतो. या भक्तीमय वातावरणात, देवीच्या पूजेसाठी रोजच काही पुजारी जबाबदारी पार पाडतात. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, या पुजाऱ्यांना त्यासाठी किती मानधन दिलं जातं?

बहुतेक लोकांना वाटतं की अशा पवित्र स्थळी सेवा करणं हे केवळ एक धार्मिक कर्तव्य असावं, पण प्रत्यक्षात यासाठी पुजाऱ्यांना चांगले आर्थिक मानधन दिलं जातं. विशेषतः ‘श्री माता वैष्णो देवी श्राईन बोर्ड’ (SMVDSB) या संस्थेमार्फत या सर्व बाबी व्यवस्थित नियोजित पद्धतीने हाताळल्या जातात.

श्राईन बोर्डद्वारे केवळ मंदिर व्यवस्थापन, स्वच्छता आणि सुरक्षा यांचीच जबाबदारी पार पाडली जात नाही, तर येथे काम करणाऱ्या प्रत्येक पुजाऱ्याचा पगार ठरवण्याचाही निर्णय याच बोर्डकडून घेतला जातो. विशेष म्हणजे हे मानधन शासकीय पगार संरचनेच्या धर्तीवर निश्चित केलं जातं.

वैष्णो देवी मंदिरातील पुजार्‍यांना किती पगार मिळतो ?

उपलब्ध माहितीनुसार, या मंदिरात मुख्य पुजाऱ्याला वेतन श्रेणी १६ अंतर्गत ५६,६०० ते १,७९,८०० रुपयांदरम्यान मानधन दिलं जातं. तर सीनियर पुजाऱ्यांना लेव्हल १० अंतर्गत ३५,८०० ते १,१३,२०० रुपये इतका पगार दिला जातो. याशिवाय, इतर पुजाऱ्यांनाही त्यांच्या ग्रेडनुसार ३५,४०० ते १,१२,४०० रुपयांपर्यंत पगार दिला जातो.

फक्त वैष्णो देवीच नव्हे तर देशातील इतर प्रमुख मंदिरांमध्येही पुजाऱ्यांना चांगले मानधन दिलं जातं. उदाहरण द्यायचं झालं तर अयोध्येतील श्रीराम मंदिरातील मुख्य पुजारी यांना दरमहा ३२,९०० रुपये पगार मिळतो. तर त्यांच्या सहायक पुजाऱ्यांना ३१,००० रुपयांचा मासिक वेतन दिला जातो. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच हे वेतन वाढवण्यात आलं. आधी मुख्य पुजाऱ्याचा पगार २५,००० रुपये आणि सहायक पुजाऱ्यांचा पगार २०,००० रुपये होता.

अर्थात, मंदिरांमध्ये सेवा देणं हा केवळ एक धर्मकार्यार्थ नसून, एक जबाबदारी आणि त्यासाठी योग्य पगार ही देखील व्यवस्थेचा भाग बनली आहे. देशभरातील या मोठ्या मंदिरांची आर्थिक व्यवस्था किती सक्षम आणि शिस्तबद्ध आहे, याचे हे एक ठोस उदाहरण आहे.

(टीप- इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारलेला हा लेख आहे. त्यामुळे लेखात दिलेल्या माहितीत काही प्रमाणात बदल असू शकतो)  

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.