Varuthini Ekadashi 2021 | ज्या व्रतामुळे महावेदांना शापातून मुक्तता मिळाली ती वरुथिनी एकादशी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

Varuthini Ekadashi 2021 | ज्या व्रतामुळे महावेदांना शापातून मुक्तता मिळाली ती वरुथिनी एकादशी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व
lord vishnu

कादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. वैशाख महिन्यात पडणारी एकादशी वरुथिनी एकादशी (Varuthini Ekadashi) म्हणून ओळखली जाते

Nupur Chilkulwar

|

Apr 28, 2021 | 1:02 PM

मुंबई : हिंदू कॅलेंडरनुसार दर महिन्याला दोनदा एकादशी येते. शास्त्रात एकादशीला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. बरेच लोक या दिवशी व्रत ठेवतात. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. वैशाख महिन्यात पडणारी एकादशी वरुथिनी एकादशी (Varuthini Ekadashi) म्हणून ओळखली जाते (Varuthini Ekadashi 2021 Know The Date Shubh Muhurat Puja Vidhi And Importance Of This Ekadashi).

जे लोक या एकादशीला व्रत ठेवतात, त्यांना वैकुंठाची प्राप्ती होते. या दिवशी विधीवत पूजा केल्यान भगवान विष्णू प्रसन्न होतात. चला वरुथिनी एकादशीची तिथी, महत्त्व आणि शुभ मुहूर्त याबद्दल जाणून घेऊया –

वरुथिनी एकादशी तिथी

वैशाख महिन्यात कृष्ण पक्षात पडणारी एकादशी वरुथिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. यावेळी वरुथिनी एकादशी 7 मे 2021 रोजी पडत आहे. या दिवसाला भगवान विष्णूच्या वामन अवताराची पूजा केली जाते.

वरुथिनी एकादशीचा शुभ मुहूर्त

एकादशी तिथी 06 मे 2021 रोजी दुपारी 02 वाजेपासून ते 07 मे 2021 रोजी संध्याकाळी 03 वाजून 32 मिनिटांपर्यंत असेल.

एकादशी उपवासाची वेळ – 08 मे 2021 रोजी सकाळी 05.35 ते सायंकाळी 08:16 असा असेल.

वरुथिनी एकादशीचा पूजा विधी

वरुथिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि घराच्या मंदिरात दिवा लावावा.

त्यानंतर भगवान विष्णूंचा अभिषेक करावा आणि त्यांना नवीन वस्त्र घालावे. मग विधीवत पूजा करावी.

भगवान विष्णूच्या आवडीचे पदार्थ वरुथिनी एकादशीला नैवेद्य म्हणून दाखवाव्या.

दुसर्‍या दिवशी द्वादशीचे व्रत सोडावे.

वरुथिनी एकादशीची पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार भगवान शिव रागावले आणि त्यांनी ब्रह्मदेवाचे पाचवे शिर कापले. ज्यामुळे त्यांना शाप लागला. या शापातून मुक्त होण्यासाठी भगवान शिवने वरुथिनी एकादशीचे व्रत केले. हे व्रत केल्याने भगवान शिव शापातून मुक्त झाले. धार्मिक मान्यतांनुसार, हे व्रत पाळल्याने अनेक तपस्यांइतकं फळ मिळतं.

वरुथिनी एकादशीचं महत्त्व

वरुथिनी एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने घरात यश, संपत्ती आणि सुख-समृद्धी येते. या व्रताचे पालन केल्याने मोक्ष प्राप्त होतो. हे व्रत ठेवल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात, अशी मान्यता आहे.

Varuthini Ekadashi 2021 Know The Date Shubh Muhurat Puja Vidhi And Importance Of This Ekadashi

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vaishakh 2021 : वैशाख महिन्याला आजपासून सुरुवात, ब्रम्हाजींनुसार हा सर्वश्रेष्ठ महिना, जाणून घ्या याबाबत आणखी माहिती…

Kamada Ekadashi 2021 | कामदा एकादशी तिथी, वेळ, महत्त्व आणि कथा, जाणून घ्या…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें