Debt removal vastu remedies : कर्ज कमी होत नाहीये, वास्तू दोष याचं कारण असू शकते, हे महाउपाय करा

आयुष्यात कर्ज कधीही चांगले मानले जात नाही, कारण जी व्यक्ती कर्जाच्या ओझ्याखाली आहे त्याला ना दिवसा शांतता मिळत ना रात्री. त्याला रात्री झोप येते नाही. व्यक्तीला अनेकदा इच्छा नसतानाही एखाद्याकडून कर्ज घ्यावे लागते. कर्जासंदर्भात अडचण तेव्हा सुरु होते जेव्हा आपण आपली कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ असतो आणि आपण त्याच्या जाळ्यात अडकत जातो.

Debt removal vastu remedies : कर्ज कमी होत नाहीये, वास्तू दोष याचं कारण असू शकते, हे महाउपाय करा
vastu-tips

मुंबई : आयुष्यात कर्ज कधीही चांगले मानले जात नाही, कारण जी व्यक्ती कर्जाच्या ओझ्याखाली आहे त्याला ना दिवसा शांतता मिळत ना रात्री. त्याला रात्री झोप येते नाही. व्यक्तीला अनेकदा इच्छा नसतानाही एखाद्याकडून कर्ज घ्यावे लागते. कर्जासंदर्भात अडचण तेव्हा सुरु होते जेव्हा आपण आपली कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ असतो आणि आपण त्याच्या जाळ्यात अडकत जातो. वास्तुनुसार, घरामध्ये असे अनेक दोष आहेत जे या परिस्थितीला कारणीभूत ठरतात. ज्यामुळे व्यक्ती अनेकदा कर्जाच्या ओझ्याखाली दबली जाते. चला कर्जाशी संबंधित असे काही वास्तू दोष जाणून घेऊया, जे वेळीच दूर केले पाहिजेत.

🔷 जर तुम्हाला असे वाटत असेल की आयुष्यात कोणतेही कर्ज असू नये किंवा तुम्ही लवकरच त्यातून मुक्त व्हावे. तर यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला एक लाकडी मंदिर ठेवावे आणि मंदिराला खाली गोल पाय असावे आणि ते कधीही भिंतीला लावून ठेवू नये.

🔶 जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती नेहमी मजबूत असावी असं वाटत असेल आणि तुम्हाला कोणाकडून कर्ज घ्यावे लागू नये असं वाटत असेल. तर, भारी इमारतींमध्ये दबलेला प्लॉट कधीही खरेदी करु नका. अशा घरात राहणाऱ्या लोक कर्जात बुडतात.

🔷 घरात अंडरग्राउंड टाकी, विहीर, बोरींग किंवा नळ दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण दिशेला असल्यास घरात दारिद्र्य येते. उत्तर दिशेच्या दिशेने जितका उतार असेल तितकी मालमत्तेत वाढ होईल. जर तुम्ही कर्जामुळे खूप अस्वस्थ आणि दु:खी असाल तर तुमच्या घराचा उतार ईशान्य दिशेला करा तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल.

🔶 वास्तुनुसार चुकीच्या दिशेने ठेवलेले आरसे गंभीर वास्तुदोषांचे कारण ठरतात. त्यामुळे उत्तर किंवा पूर्व दिशेला आरसा ठेवू नये, अन्यथा कर्ज वाढत जाईल.

🔷 वास्तूनुसार, घराच्या पायऱ्या कधीही पूर्व किंवा उत्तर भिंतीवरुन चढू नका. जीवनाचे वजन फक्त दक्षिण किंवा पश्चिम भिंतीवर असले पाहिजे. असे केल्याने त्या घरात राहणाऱ्या लोकांच्या उत्पन्नाचे साधन, संपत्ती, नफाचे साधनं संपतात.

🔶 वास्तूनुसार ईशान्येकडे पूजास्थळाच्या खाली दगडाचा स्लॅब ठेवू नये, अन्यथा ती व्यक्ती ऋणी होते. तसेच ईशान्य भागात ज्योत प्रज्वलित करणे घातक ठरु शकते. या कोपऱ्यात हवन करणे म्हणजे तोटा, ऋण आणि संकटांना आमंत्रण देणे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Best remedy for wealth : आर्थिक संकटांनी वेढलेले असाल तर हे सात उपाय करा, आर्थिक भरभराट होईल

Vastu Tips | घरात मनी प्लांट लावताना या 5 चुका करु नये, आर्थिक नुकसान होऊ शकते

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI