वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे? जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार घराचे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणे शुभ मानले जाते, तर जर घराचे स्वयंपाकघर पश्चिम दिशेला असेल तर घरातील सदस्यांमध्ये वारंवार आजारी पडण्याचा धोका वाढतो. चला, जाणून घ्या वास्तुशास्त्राच्या स्वयंपाकघराशी संबंधित नियम.

कधी कधी असं होतं की चांगला डाएट घेतल्यानंतरही लोक आजारी पडतात किंवा लोकांना स्वतःच्या घरचं जेवण आवडत नाही. वास्तुशास्त्रानुसार घरातील जेवणाशी ही एक ऊर्जा निगडित असते. या ऊर्जेचा आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होतो.
उदाहरणार्थ, वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात, विशेषत: स्वयंपाकघरात नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा परिणाम तुमच्या अन्नावरही होतो. स्वयंपाकघरातील वास्तुदोषांमुळे लोक आजारी पडू लागतात किंवा अन्न खाल्ल्यानंतर त्यांची मानसिक स्थिती योग्य नसते. अशावेळी तुम्हाला स्वयंपाकघराशी संबंधित वास्तु नियम माहित असणे आवश्यक आहे. आपले स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे हे सविस्तर जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे?
वास्तुशास्त्रानुसार आग्नेय कोन स्वयंपाकघरासाठी सर्वात शुभ मानला जातो. घराच्या पूर्व व दक्षिण दिशेच्या क्षेत्राला आग्नेय कोन म्हणतात. ही दिशा अग्नी तत्त्वाशी निगडित आहे. आग्नेय कोनाला अग्निकोन असेही म्हणतात. अग्नीकोनाचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या दिशेला स्वयंपाकघर असल्याने घरात सुख-समृद्धी राहते. तसेच घरातील लोकही निरोगी असतात.
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर कोणत्या दिशेला नसावे?
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर बनवण्यासाठी काही दिशा योग्य मानल्या जात नाहीत. उदाहरणार्थ, उत्तर किंवा ईशान्येकडे बांधलेले स्वयंपाकघर गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते, म्हणून आपल्या घराच्या नैऋत्य दिशेला स्वयंपाकघर नसावे. याशिवाय स्वयंपाकघर बनवण्यासाठी पश्चिम दिशाही योग्य मानली जात नाही. वास्तुशास्त्रानुसार घराच्या पश्चिम दिशेला स्वयंपाकघर बांधले तर घरातील क्लेश होण्याची शक्यता वाढते.
स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला बांधले असेल तर करा ‘हे’ उपाय
तुमचे स्वयंपाकघर चुकीच्या दिशेने बांधले गेले असेल तर स्वयंपाकघरात काही उपाय करणे चांगले जेणेकरून स्वयंपाकघरातील ऊर्जा सकारात्मक राहू शकेल. यासाठी सर्वप्रथम सकाळी आणि संध्याकाळी स्वयंपाकघरात धूर पसरवावा. तसेच स्वयंपाकघराच्या ईशान्य दिशेला सिंदुरी गणेशाचे चित्र ठेवावे.
घराच्या पूर्व व दक्षिण दिशेच्या क्षेत्राला आग्नेय कोन म्हणतात. ही दिशा अग्नी तत्त्वाशी निगडित आहे. आग्नेय कोनाला अग्निकोन असेही म्हणतात. अग्नीकोनाचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या दिशेला स्वयंपाकघर असल्याने घरात सुख-समृद्धी राहते.
शुक्रासाठी करा ‘हे’ खास उपाय
शुक्राचा संबंध अग्नी तत्वाशी असल्याचे दिसून येते, त्यामुळे शुक्रासाठी शुक्रवारी तांदूळ, खीर किंवा नारळाचे लाडू बनवावेत. शुक्रासाठी स्वयंपाकघरात अग्नी तत्त्वाशी संबंधित फोटोही ठेवता येतो.
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
