AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात आरसा लावताना या चुका टाळाच, अन्यथा घरात येते गरिबी

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरातील वस्तू कोणत्या दिशेला असाव्यात? याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात आरसा लावताना अनेकजण चुका करतात, मात्र त्यामुळे घरात गरिबी येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

Vastu Shastra : घरात आरसा लावताना या चुका टाळाच, अन्यथा घरात येते गरिबी
mirrorImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 18, 2026 | 9:24 PM
Share

वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घरामध्ये असलेल्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात? जर एखादी वस्तू अयोग्य दिशेला ठेवली गेली तर त्याचा काय परिणाम होतो? अशा अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घरात असलेल्या आरशाला अत्यंत संवेदनशील वस्तू माण्यात आलं आहे. वास्तुतज्ज्ञांच्या मते तुमच्या घरातील आरसा हा केवळ तुमचं प्रतिबिंबच दाखवत नाही तर तो तुमच्या घरातील ऊर्जेला देखील कंट्रोल करतो. त्यामुळे घरात आरसा लावताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. वास्तुशास्त्रानुसार घरात अशा काही जागा असतात, तिथे चुकूनही आरसा लावता कामा नये. यामुळे घरात नकारात्मक शक्ती वाढते, त्यामुळे घरात तणाव निर्माण होतो, तसेच गरिबी देखील येते.

जर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये आरसा लावणार असाल तर एका गोष्टीची काळजी घ्या, कधीही आरसा तुमच्या बेडच्या बरोबर समोर लावू नका, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. कारण रात्री झोपताना तसेच सकाळी उठल्यानंतर लगेचच आरशात स्वत:चं प्रतिबिंब पहाणं हे वास्तुशास्त्रामध्ये अशुभ माण्यात आलं आहे. यामुळे घरात विविध समस्या निर्माण होऊ शकतात, तसेच पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊन घरात भांडणं होतात. पती-पत्नीच्या नात्यावर याचा वाईट परिणाम होतो.

त्याच प्रमाणे घरात आरसा लावताना तुम्ही तो कोणत्या दिशेला लावता आहात? हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. आरसा चुकूनही दक्षिण किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीला लावू नये, यामुळे घरात सतत भांडणं होतात, तसेच गरिबी येते असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं होतं. जर आरसा घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावला तर कुटुंब प्रमुखावर कर्ज देखील वाढतं, त्यामुळे घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला आरसा लावणं अशुभ माण्यात आलं आहे.

घरामध्ये आरसा लावताना नेहमी एका गोष्टीची काळजी घ्यावी, आरसा हा एका ठराविक उंचीवरच लावावा, आरसा जास्त उंचीवर देखील असू नये, किंवा कमी उंचीवर देखील असू नये, यामुळे देखील घराच्या परिस्थितीवर परिणाम होतो. कर्ज वाढतं, असा दावा वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा