AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेला घरी आणा या 5 वस्तू, आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही

अक्षय तृतीया हे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, त्यामुळे या दिवशी काही विशिष्ट गोष्टी खरेदी करणं हे शुभ मानलं जातं. जर तुम्ही या वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केल्या तर तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्र काय सांगतं?

Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेला घरी आणा या 5 वस्तू, आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही
Akshaya TritiyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 17, 2026 | 8:29 PM
Share

अक्षय तृतीया हे हिंदू धर्मामध्ये जे साडेतीन शुभ मुहूर्त आहेत, त्यातील एक मुहूर्त आहे. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक मोठा सण आहे. तसेच वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून देखील या सणाचं मोठं महत्त्व आहे. यावर्षी 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया हे शुभ मुहूर्त असल्यामुळे अनेकजण या दिवशी विविध वस्तूंची खरेदी करतता. सोन्याला विशेष महत्त्व असतं. त्यामुळे या दिवशी अनेक जण सोनं खरेदी करतात, त्यामुळे या दिवशी सोन्याच्या भावात देखील वाढ झाल्याचं पहायला मिळतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणी आपल्या नव्या व्यवसायाला सुरुवात करतं, तर कोणी नवीन घर खरेदी करतं, कोणी नव्या घरामध्ये गृहप्रवेश करतं. या दिवशी अनेकजण वाहनाची देखील खरेदी करतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार अशा पाच गोष्टी आहेत, ज्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केल्या पाहिजेत. यामुळे तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं. चला तर मग जाणून घेऊयात अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात?

कापूस – वास्तुशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी केला पाहिजे. या उपायामुळे घरात आर्थिक स्थिरता टिकून राहते. तसेच जर तुमच्यावर भविष्यात काही आर्थिक संकट येणार असेल तर ते दूर होतं. तुमच्या हातात पैसा टिकून राहतो. असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

झाडू – अक्षय तृतीया हे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशी झाडू खरेदी करणं शुभ मानलं जातं. जर तुम्ही या दिवशी झाडू खरेदी केला तर तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, ज्याचा परिणाम हा तुमच्यावर होतो.

मीठ – अक्षय तृतीयेला मीठ खरेदी करावं, कारण हिंदू धर्मामध्ये मीठ लक्ष्मी मातेचं प्रतिक मानलं गेलं आहे. जर तुम्ही अक्षय तृतीयेला मीठ खरेदी केलं तर तुमच्यावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो. लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमची भरभराट होते. तुम्हाला आयुष्यात कधीही धनाची कमी भासत नाही.

सोनं – अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. हिंदू धर्मशास्त्रानुसार तुम्ही अक्षय तृतीयेला जी वस्तू खरेदी करता ती वर्षभर तुमच्या घरात येत राहते, त्यामुळे या दिवशी लोक आवर्जून सोनं खरेदी करतात. या दिवशी सोनं खरेदी केल्याने घराला बरकत प्राप्त होते.

चांदी – तुम्ही अक्षय तृतीयेला चांदीची देखील खरेदी करू शकता. यामुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...