AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : मोहरीच्या तेलाचा आणि तुरटीचा करा हा चमत्कारीक उपाय, तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही

अनेकदा असं घडत की आपल्या आयुष्यात संकटांची मालिका सुरूच असते, एक झालं की एक संकट येतं. मनाला शांती लाभत नाही, त्यासाठी वास्तुशास्त्रात मोहरीचं तेल आणि तुरटीचे काही उपाय सांगण्यात आले आहेत. त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : मोहरीच्या तेलाचा आणि तुरटीचा करा हा चमत्कारीक उपाय, तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही
vastu shastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 06, 2026 | 8:46 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार अनेक कारणांमुळे आपल्या घरात नकारात्मक शक्ती तयार होते. जेव्हा आपल्या घरात नकारात्मक शक्ती तयार होते, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या होतो. जर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती असेल तर घरात आजारपण वाढतं, आर्थिक स्थैर्य लाभत नाही. कितीही पैसा कमावला तरी तो घरात टिकत नाही. खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होते. एवढंच नाही तर काहीही कारण नसताना सारखे भांडणं होतात. जर समजा तुम्ही कर्ज घेतलं असेल तर ते देखील लवकर फिटत नाही. तुम्हाला व्यावसायामध्ये तोटा होतो. लोक उधारीचे पैसे देत नाहीत. त्यामुळे तुम्ही अडचणीत येतात. घर एक प्रकारे अस्थिर बनतं. एवढंच नाही तर तुमची सारखी चिडचिड होते, घरात आल्यानंतर तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटू लागतं. हा सर्व नकारात्मक ऊर्जेचा देखील परिणाम असू शकतो, अशा प्रकारचे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

पैशांच्या कामात अडथळा – जर तुम्हाला पैशांच्या कामामध्ये अडथळा येत असेल, आर्थिक व्यवहार थांबले असतील, तुमच्या हातात पैसा टिकत नसेल किंवा तुमच्यावर कर्ज वाढले असेल. तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. दर मंगळवारी आणि शनिवारी मोहरीच्या तेलात थोडी तुरटी मिक्स करून भगवान हनुमानांसमोर दिवा लावावा यामुळे सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात.

व्यावसायामध्ये अडथळा – जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये अडथळा येत असेल व्यवसाय वाढत नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या कार्यालयाच्या दोन्ही दरवाजामागे एक छोटी वाटी तुरटी आणि मोहरीचं तेल भरून ठेवा. यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील, तसेच तुमचं नकारात्मक शक्तींपासून संरक्षण होईल.

वाईट नजरेपासून संरक्षण – जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घराला किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला कोणाची तरी नजर लागली आहे, तर अशावेळी तुम्ही एका वाटीमध्ये मोहरीचं तेल आणि तुरटी एकत्र करून ते सातवेळा संबंधित व्यक्तीच्या डोक्यावरू उतरावे आणि त्यानंतर हे तेल व तुरटी वाहत्या पाण्यात सोडून द्यावी, या उपायामुळे संबंधित व्यक्तीच्या मागे असलेली सर्व इडापिडा दूर होते. त्याचं मन स्थिर राहतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा