Vastu Shastra : बेडरूममध्ये चुकूनही लावू नका हा फोटो, परिणाम खूप भयंकर, पती-पत्नीमध्ये सतत होतील भांडणं
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अशा काही गोष्टी असतात, त्या जर चुकीच्या ठिकाणी ठेवल्या गेल्या तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? याबद्दल तर मार्गदर्शन करण्यात आलंच आहे. मात्र वास्तुशास्त्रामध्ये असं देखील म्हटलं आहे की, घरात अशा काही गोष्टी असतात ज्या जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या दिशेला ठेवल्या तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा तुमच्यासोबतच तुमच्या संपूर्ण कुटुंबावर देखील पडतो. जर घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली किंवा वास्तुदोष निर्माण झाला तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, जसं की कोणतंही कारण नसताना घरात सतत भांडणं होणं, अचानक धन हानी, कायम पैशांची तंगी या सारखे संकटं तुमच्या घरावर येऊ शकतात. दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये असे काही फोटो आणि मूर्ती सांगण्यात आल्या आहेत, ज्या तुमच्या बेडरूममध्ये नसावेत असं म्हटलं आहे. जर असे फोटो बेडरूममध्ये असतील तर त्यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणं होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. आज आपण अशाच काही फोटोंबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
काटेरी वनस्पती असलेला फोटो- बेडरूममध्ये काटेरी वनस्पती असलेला फोटो असू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं. जसं की बेडरूममध्ये निवडुंगासारख्या वनस्पतीचा फोटो असू नये, यामुळे नात्यातील गोडवा संपतो, घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यास त्याचा परिणाम हा पती-पत्नीच्या नात्यावर होतो, असंही वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.
मावळत्या सूर्याचा फोटो – बेडरूममध्ये मावळत्या सूर्याचा फोटो लावणं वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं गेलं आहे, त्याऐवजी उगवत्या सूर्याचा फोटो लावावा असं सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. सोबतच बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो लावावा मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी की चुकूनही एकट्या कृष्णाचा किंवा एकट्या राधाचा फोटो बेडरूममध्ये लावू नये. राधाकृष्णाचा फोटो बेडरूममध्ये लावल्यास घरात सूख शांती येते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
