Vastu Shastra : घरात चुकूनही लावू नका हे झाड, नाहीतर बरबाद झालाच म्हणून समजा, मिळतं भांडणाला आमंत्रण
वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं हे अत्यंत शुभ मानले गेले आहेत, त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते, मात्र असे देखील काही झाडं आहेत ती वास्तुशास्त्रानुसार अशुभ आहेत, त्यामुळे घरात प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा तयार होते. वास्तुदोष निर्माण होतो, अशाच एका झाडाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? यासंबंधी चिकित्सा करण्यात आली आहे. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? देवघर कोणत्या दिशेला असावं? घराची दिशा कोणती असावी? अशा अनेक प्रश्नांवर वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे. मात्र त्याचबरोबर घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तो कसा दूर करायचा? यावर देखील अनेक उपाय हे वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. हिंदू धर्मशास्त्र आणि ज्योतिशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे. जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर भविष्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही, असं धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
अनेक जण आपलं घर सजवण्यासाठी झाडांचा उपयोग करतात, काही जण आपल्या घरात, घराच्या खिडक्यांमध्ये अथवा घराच्या गॅलरीमध्ये झाडं लावतात. तर काही जण आपल्या घराभोवती मस्त अशी बाग तयार करतात. वास्तुशास्त्रामध्ये झाडांना देखील खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार काही झाडं ही सकारात्मक ऊर्जा देणारी असतात, अशा झाडांमुळे घरातील वास्तुदोष नाहीसा होतो, घरातील वातावरण प्रसन्न रहातं, घरात सुख शांती रहाते. तर काही झाडं हे अशी असतात ज्यामुळे तुमच्या घरातील वातावरण अस्थिर होतं, घरात सतत भांडणं होतात, त्यामुळे अशी झाडं न लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आलेला आहे.
वास्तुशास्त्रामध्ये निवडुंगाचं झाड हे खूप अशुभ मानलं गेलं आहे, निवडुंगाचं झाड हे काटेरी असतं. काटेरी झाडं घरात किंवा घराच्या परिसरात नसावेत असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. निवडुंगाचं झाड जर तुमच्या घरात किंवा घराच्या परिसरात असेल तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्याचा परिणाम हा तुमच्या कुटुंबातील व्यक्तींवर होतो. त्यामुळे अनेकदा कारण नसताना देखील भांडणं होतात, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. त्यामुळे घरात निवडुंगाचं झाडं न लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. निवडुंगाप्रमाणेच इतरही काटेरी झाडं हे तुमच्या घरात असू नये, यामुळे प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो, असं देखील वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
