AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : तुम्हालाही ऑफीसच्या डेस्कवरच जेवणाची सवय आहे? मग आजच व्हा सावध, वास्तुशास्त्र काय सांगतं?

अनेकांना ऑफिसच्या डेस्कवरच जेवणाची सवय असते, मात्र ऑफिसच्या डेस्कवर जेवण करणं योग्य आहे का? त्याचा आपल्या कामावर काही परिणाम होऊ शकतो का? याचा विचार तुम्ही कधी केलाय का? नसेल तर चला जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे, त्याबद्दल.

Vastu Shastra : तुम्हालाही ऑफीसच्या डेस्कवरच जेवणाची सवय आहे? मग आजच व्हा सावध, वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastushtra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 02, 2026 | 9:20 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार आपल्या सभोवती ज्या काही वस्तू असतात, त्या प्रत्येक वस्तूमध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा असते. ही ऊर्जा सकारात्मकही असू शकते किंवा नकारात्मक देखील असू शकते. त्यामुळे अशा वस्तूंचा आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच अनेकदा असं देखील होतं की आपण एखादी शुभ फळ देणारी वस्तू घरी आणतो, परंतु ती आपण ज्या दिशेला ठेवतो ती दिशा चुकते आणि या वस्तूचा आपल्यावर नकारात्मक परिणाम होण्यास सुरुवात होते. त्यामुळे घरात तसेच तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर काही विशिष्ट गोष्टी न ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. तसेच कधीही ऑफिसच्या डेस्कवर जेवण करू नये, असं देखील वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

घरात आणि ऑफिसच्या डेस्कवर कोणत्या वस्तू नसाव्यात?

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूला तिची विशिष्ट ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेचा आपल्यावर परिणाम होतो. त्यामुळे ज्या वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, अशा वस्तू घरात आणि ऑफिसच्या डेस्कवर ठेवू नये, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. जसं की बंद पडलेलं घड्याळ हे कधीही ऑफिसच्या डेस्कवर किंवा घरात नसावं, कारण घड्याळाला वेळेचं प्रतिक मानलं जातं. घड्याळाला गतीचं देखील प्रतिक मानलं जातं. त्यामुळे घरात किंवा ऑफिसमध्ये जर बंद पडलेलं घड्याळ असेल तर त्याला अशुभ मानलं जातं, त्यामुळे कधीही घरात किंवा ऑफिसच्या डेस्कवर बंद पडलेलं घड्याळ असू नये, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. त्याचसोबत घरात आणि ऑफिसच्या डेस्कवर कधीही काटेरी झाडं ठेवू नये, यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याचा परिणाम हा तुमच्या कामावर होतो.

ऑफिसच्या डेस्कवर जेवल्यास काय होतं?

ऑफिसच्या डेस्कवर जेवण करू नये, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे, कारण तुम्ही जर ऑफिसच्या डेस्कवर जेवत असाल तर त्याचा परिणाम हा तुमच्या कामावर होतो. आधीच तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर कामाच्या प्रचंड फाईल पडलेल्या असतात. त्यामुळे तिथल्या ऊर्जेत मोठ्या प्रमाणात जडत्व असतं, आणि त्यात तुम्ही जर अशा ठिकाणी जेवलात तर ऊर्जा आणखी जड होते, ज्याचा परिणाम हा तुमच्या कामावर होतो. अंगात एक प्रकारचा आळस येतो आणि काम उरकत नाही, त्यामुळे कधीही ऑफिसच्या डेस्कवर जेऊ नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us