Vastu Shastra : तुमच्याही घरात सकाळी-सकाळी मांजर येते? असतात या गोष्टींचे संकेत
वास्तुशास्त्रानुसार तुम्ही सकाळी जेव्हा झोपेतून उठता तेव्हा काही गोष्टी जर तुम्हाला दिसल्या तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत असतात, मात्र अशा देखील काही गोष्टी असतात, ज्या अशुभ मानल्या जातात. आज आपण जाणून घेणार आहोत, घरात जर सकाळी मांजर येत असेल तर त्यामागे काय संकेत असतात?

वास्तुशास्त्रानुसार सकाळची वेळ ही अत्यंत शुभ मानली गेली आहे, त्यामुळेच सकाळी जास्त वेळ न झोपता लवकर उठण्याचा सल्ला देण्यात येतो. सकाळची वेळ ही आरोग्यदायी असते, तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठून तयार होता, तेव्हा दिवसभर तुम्ही एका वेगळ्याच ऊर्जेचा अनुभव घेता, मात्र जेव्हा तुम्हाला झोपेतून उठण्यासाठी उशिर होतो, तेव्हा दिवसभर तुमच्या शरीरात आळस कायम असतो. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून लवकर उठता आणि काही गोष्टी झोपेतून उठल्या -उठल्या तुमच्या नजरेस पडल्या तर ते अतिशय शुभ संकेत असतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस उत्तम जातो. जसं की तुम्ही झोपेतून उठलात आणि तुम्हाला भारतद्वाज पक्ष्याचं दर्शन झालं किंवा मुंगूसाचं दर्शन झालं तर तुम्हाला नक्कीच दिवसभरात एखादी आनंदाची बातमी मिळणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. आज आपण पहाणार आहोत, की दररोज सकाळी -सकाळीच जर मांजर आपल्या घरात येते असेल तर त्याचे वास्तुशास्त्रानुसार नेमके काय संकेत असतात. हे शुभ आहे की अशुभ?
पांढरी मांजर – पांढरी मांजर जर दररोज तुमच्या घरात सकाळी -सकाळी येत असेल तर ते शुभ मानलं जातं, कारण अशी मान्यता आहे, की पांढऱ्या मांजरीमुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
पाहुणे येण्याचे संकेत – जर सकाळी -सकाळीच मांजर तुमच्या घरात आली असेल तर तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत, याचे हे संकेत असू शकतात, जसं की कावळा जर तुमच्या घरासमोर ओरडत असेल तर घरी पाहुणे येणार असं मानलं जातं, तसेच जर सकाळी-सकाळी घरात मांजर आली तर घरी पाहुणे येणार असं मानलं जातं.
यश – जर सकाळी -सकाळी मांजरीचं दर्शन झालं तर हे देखील शुभ मानलं जातं, विद्यार्थ्यांसाठी हा एक शुभ संकेत आहे, तो ज्या परीक्षेची तयारी करतो आहे, त्यामध्ये त्याला यश मिळेल असा त्याचा अर्थ होतो.
स्वाप्नात मांजर पहाणे – स्वप्नात मांजर पहाणे हे मात्र एक अशुभ लक्षण आहे, त्यामुळे लवकर तुम्हाला एखादी आर्थिक अडचण येऊ शकते असा त्याचा अर्थ होतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
